Breaking
ई-पेपरकविताबीडमराठवाडासाहित्यगंध

सहल आमची

राजश्री मिसाळ ढाकणे ता. जिल्हा बीड

0 4 8 2 8 6

सहल आमची

भल्या पहाटे उठून सारे
झाले सहलीसाठी तयार
बसमध्ये चढताना दिसले
चेहऱ्यावरती कुतूहल फार…!!

बस सुरू होताच पालकांनी
टाटा बाय बाय सुरू केले
गाण्याच्या तालावर मुलांचे
खूप छान नृत्य सुरू झाले…!!

खिडकीतून रस्ते डोंगर
मागे पळू लागले भरभर
पुलाखाली नदीचे पाणी
वाहताना दिसले सरसर…!!

सहलीचे ठिकाणी येताच
आनंद ओसंडून वाहिला
उंटस्वारी झुकझुक गाडी
मातीकाम पपेटशो पाहिला…!!

नास्ता आणि बर्फचा गोळा
तोंड लाल लाल दिसू लागले
झिप लाईन, रहाट पाळणा
आनंददायी नवे खेळ चांगले…!!

खेळून पुन्हा एकदा सर्वांनी
मारला पाणीपुरीवरच ताव
खेळण्यात रममाण होऊन
विसरले आई वडील नि गाव…!!

रेनडान्स करून ओलेचिंब
टवटवीत झाले पुन्हा सारे
स्वादिष्ट हुरडा पार्टी जेवण
पदार्थ वाढलेले ताट न्यारे…!!

नवे खेळ शिस्त नि मदत
स्वावलंबन धडा शिकले
मौजमस्ती दिवसभर सुरू
तरीही नाही कोणी थकले…!!

अविस्मरणीय दिवस खास
हरपले चिमुकल्यांचे भान
सहल आमची झाली खूप
आनंददायी नि छान छान…!!

राजश्री मिसाळ ढाकणे
ता. जिल्हा बीड

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे