Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रसंपादकीयसांगलीसाहित्यगंध

“संकटातही मनी आशेचा दीप तेवत रहावा”; वृंदा करमरकर

सोमवारीय 'काव्यत्रिवेणी' स्पर्धेचे परीक्षण

0 6 6 3 3 4

“संकटातही मनी आशेचा दीप तेवत रहावा”; वृंदा करमरकर

सोमवारीय ‘काव्यत्रिवेणी’ स्पर्धेचे परीक्षण

मानवी जीवन हे सुख-दुःख, आशा-निराशा आणि यश-अपयश यांच्या विविध अनुभवांनी गुंफलेले आहे. जीवनाच्या प्रवासात प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी संकटांचा सामना करावा लागतो. संकटे ही कोणालाही सांगून येत नाहीत. ती कधी नैसर्गिक आपत्तीच्या रूपाने, कधी आर्थिक अडचणींच्या स्वरूपात, तर कधी कौटुंबिक, सामाजिक किंवा वैयक्तिक समस्यांच्या माध्यमातून समोर उभी राहतात. मात्र, संकट आले म्हणून खचून न जाता त्याला धैर्याने सामोरे जाणे, हीच खऱ्या अर्थाने जीवन जगण्याची कला आहे. संकट म्हणजे केवळ अडथळा नसून आपल्या संयमाची, जिद्दीची आणि आत्मविश्वासाची परीक्षा असते.

अनुकूल परिस्थितीत प्रत्येक जण हसतमुख असतो; परंतु प्रतिकूल परिस्थितीतही मनाचा तोल सांभाळणारी व्यक्ती खऱ्या अर्थाने कणखर असते. संकटांच्या काळात माणसाच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलू उजेडात येतात . त्याचवेळी कोण आपले आणि कोण परके, याचीही जाणीव होते. म्हणूनच संकटे माणसाला अनुभवसमृद्ध बनवतात.

इतिहासात अनेक महापुरुषांनी संकटांवर मात करून यशाची शिखरे गाठली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्याची स्थापना केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक विषमता आणि अनेक अडचणींचा सामना करत शिक्षणाच्या बळावर समाजाला नवी दिशा दिली. त्यांच्या जीवनप्रवासातून संकटांपुढे हार न मानण्याची प्रेरणा मिळते. संकटे कितीही मोठी असली, तरी इच्छाशक्ती, परिश्रम आणि योग्य नियोजन यांच्या जोरावर त्यांवर मात करता येते, हे त्यांनी सिद्ध केले. संकटाच्या काळात माणुसकीचे खरे दर्शन घडते.

नैसर्गिक आपत्ती, पूर, दुष्काळ किंवा महामारी यांसारख्या परिस्थितीत अनेक हात मदतीसाठी पुढे सरसावतात. जात, धर्म, भाषा आणि प्रांत यांचे भेद विसरून माणसे एकमेकांच्या मदतीला धावून जातात. एखाद्याला दिलेला आधाराचा हात, अन्नाची छोटीशी मदत किंवा दिलासा देणारे दोन शब्दसुद्धा संकटग्रस्त व्यक्तीसाठी मोठे बळ ठरू शकतात. संकटाच्या काळात माणसाची श्रीमंती त्याच्या संपत्तीतून नव्हे, तर दुसऱ्या च्या अश्रूंना पुसण्यासाठी पुढे सरसावणाऱ्या हातांतून दिसून येते.

‘माणुसकी जपण्याचे आणखी एक महत्त्वाचे माध्यम म्हणजे रक्तदान’. तसेच अवयवदानाच्या संकल्पातून एखाद्या गरजू व्यक्तीला नवजीवनाची संधी मिळू शकते. स्वतःच्या सुखा पलीकडे जाऊन दुसऱ्याच्या जीवनाचा विचार करणे, हीच खऱ्या माणुसकीची ओळख आहे. संकटांपासून पळ काढण्याऐवजी त्यामागील कारणे समजून घेऊन उपाय शोधणे आवश्यक आहे. अपयश आले तरी त्यातून शिकण्याची वृत्ती ठेवली पाहिजे.शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की, ‘संकटे ही जीवनातील पूर्णविराम नसतात, तर नव्या सुरुवातीची संधी असतात’. संकटांच्या अंधारातही आशेची ज्योत तेवत ठेवणारा माणूसच परिस्थितीवर विजय मिळवू शकतो. कारण संकटे माणसाला त्याच्यातील सामर्थ्याची जाणीव करून देतात. आजच्या त्रिवेणी काव्यस्पर्धेसाठी आदरणीय राहुल सरांनी ‘संकटातही’ हा वैचारिक विषय दिला आहे. या विषय निवडीसाठी त्यांचे अभिनंदन! शिलेदारांनी स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला आहे. त्याबद्दल त्यांचे आभार. पण स्पर्धेव्यतिरिक्तही शिलेदारांनी सर्व समुहात दर्जेदार लिखाण करणे अपेक्षित आहे. सरांनी मला काव्यत्रिवेणी स्पर्धेचे परिक्षण लेखनाची संधी दिल्याबद्दल राहुल सरांचे मनापासून आभार!

वृंदा (चित्रा) करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक
सांगली जिल्हा सांगली
©मराठीचे शिलेदार समूह

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 6 3 3 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे