वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन
वसुधा वैभव नाईक
वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन
मनुष्य म्हणला की त्याचे वैयक्तिक आणि व्यवसायिक जीवन हे दोन वेगळे भाग आहेत. वैयक्तिक जीवनामध्ये आपले कुटुंब, कुटुंबातील सुख,दुःख, आचार, विचार, नम्रता, विद्वत्ता, राहणीमान, वाद,संघर्ष, प्रेम इत्यादी भावनिक ओढ असते. या भावना कधी उफाळून येतात तर कधी दाबल्या जातात. पण या भावनेच्या गोतवळ्यात जीवन सुसह्य होते. कुटुंबातील लोक एकमेकांना मदत करू लागतात. एकमेकांसाठी जीवन जगणं सुसह्य होऊन जातं. दुःखामध्ये सगळे एकत्र असतात. सुखातही सर्व एकत्र असतात. त्यामुळे आपुलकी प्रेम वाढते. कधी वाद झाले तर हे वाद मिटवण्यामधे घरातील इतर लोकांचा सहभाग मनापासून असतो. आपल्या लोकांची काळजी घेतात. त्यांना हवं नको ते विचारतात. यातून आपले वैयक्तिक आरोग्य देखील सुधारते.
व्यवसायिक जीवन जगताना मात्र आपली वैयक्तिक बाजू ती बाजूला ठेवायची. व्यवसायिक जीवनामध्ये वैयक्तिक प्रॉब्लेम आणले की, लोकांना आपले हसे होते. एखादाच प्रामाणिकपणे अगदी विचार करतो. त्याच्या सुखदुःखात समाविष्ट होतो. पण व्यवसायिक जीवनामध्ये वैयक्तिक जीवन आणू नये. या मताची मी आहे. कारण तुम्ही लोकांना आनंदात असलेले बघायला आवडतं. दुःखाचा सावट तुमच्या चेहऱ्यावर दिसला तर तुमच्याजवळ कोणी येत सुद्धा नाही. एखादा विचारतो काय झालं रे तुला आज? त्यावर आपल उत्तर आपण देताना त्याच्या चेहऱ्यावरचे हाव भाव आपण पहिल्या तर असं लक्षात येते की, त्यालाही आपल्यामध्ये काही इंटरेस्ट नाहीये. समाज हा असाच असतो आनंदामध्ये आनंदी असतो दुःखामध्ये साथ न देणारा असतो.
अशा अनेक गोष्टी असतात की आपल्याला वाटते आपल्या मित्र आहे आपण त्याला काही गोष्टी शेअर कराव्यात. पण एखादाच आपला मित्र असा असतो की, आपण त्याला हे सर्व सांगू शकतो. त्याच्याकडून सल्ला घेतला जातो. ही मैत्री खूप वेगळी असते. समाजामध्ये आपलं हस होऊ नये असे वाटत असेल तर, वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंध वेगळे ठेवावेत. वैयक्तिक जीवनामध्ये व्यवसाय जीवन एकत्र केले तर.. काही लोक आपल्याला गृहीत धरू लागतात. ही अशीच आहे. आपल्यासाठी हे करूच शकते. आणि वैयक्तिक जीवनामध्ये मग प्रॉब्लेम सुरू होतात. यासाठी दोन्ही प्रोफेशन्स वेगळे ठेवावेत.
वसुधा वैभव नाईक
धनकवडी, जिल्हा पुणे
==========