Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनदेश-विदेशपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्र

डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या हस्ते 75 राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय प्रतिभावंत सन्मानित…!!

वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी

0 6 2 7 9 7

डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या हस्ते 75 राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय प्रतिभावंत सन्मानित…!!

वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

पुणे, (दि 14 ऑक्टोबर 2026): पहिल्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तसेच पहिल्या विश्व काव्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी देशविदेशातील 75 कवी कवयित्रींना स्व.नारायण सुर्वे शताब्दी काव्य पुरस्कार समिक्षा (संस्थापक, अध्यक्ष डाॅ.मधुसूदन घाणेकर) संस्थेतर्फे ऑनलाईन प्रदान केले.

सामाजिक समरसतेच्या सक्रिय योगदानातून काव्यनिर्मिती करणा-या कवीकवयित्रींना सदर पुरस्कार प्रदान करण्यात आले असल्याचे कवी डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी सांगितले.”स्वतः आंतरराष्ट्रीय किर्ती प्राप्त कवी असूनही अन्य प्रतिभासंपन्न कवी, कवयित्रींना सन्मानित करणारे डाॅ.मधुसूदन घाणेकर हे काव्यविश्वातील एकमेव कवी आहेत.

आत्तापर्यंत डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी 1000 हून अधिक साहित्यिकांना स्वखर्चाने, विनाशुल्क, विना प्रायोजक सन्मानित केले आहे.” असे प्रतिपादन साहित्य, संगीत, कला आदि विविध क्षेत्राच्या अभ्यासक मधुरा यांनी सदर पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या निमित्ताने केले. तनुजा प्रधान, अंजली कुलकर्णी, मधुकर्णिका सासवडे, यशवंत गरड, मकरंद घाणेकर, प्रा.नागेश हुलावळे, प्रभा सोनवणे, स्वाती सामक, रत्ना चौधरी, रविन्द्र गाडगीळ, राजश्री सोले, प्रा.राजश्री पाटील, दिलीप घाटे, डाॅ.संगीता तोडमल, ॲड.संध्या देशपांडे, समिक्षा चव्हाण, वसुधा नाईक, मनीषा सराफ आदि 75 कवी कवयित्रींना डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी स्व.नारायण सुर्वे शताब्दी पुरस्काराने सन्मानित केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 2 7 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे