मैत्रीच्या रंगात रंगला मैत्रीचा प्रवाह
सविता धमगाये, प्रतिनिधी नागपूर
मैत्रीच्या रंगात रंगला मैत्रीचा प्रवाह
सविता धमगाये, प्रतिनिधी नागपूर
नागपूर: (दि १७): प्रवाह मैत्रीचा समूहातर्फे दिनांक 15/05/2025 गुरूवारला डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन कांम्फरंस हाॅल उर्वेला काॅलनी वर्धा रोड नागपूर येथे समुहाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
गृहीणींना हक्काचे मंच उपलब्ध करून देणे. समाजिक कार्यात सहभाग घेणे, मनोरंजक कार्यक्रमाचे आयोजन करने हा या समुहाचा उद्देश आहे. या समुहाला आजपर्यंत तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. ज्या आमच्या महीला भगिनींना आजपर्यंत कुठेही मंच मिळ्ला नाही किंवा ज्या महीला सांसारिक कार्यात गुंतून स्वतःला विसरून गेल्या आहेत अशा महीलांनी काल मंच गाजवला.
अगदी लावणीपासून तर भक्तीगीत, फिल्मीगीत, कराओके गीत, नकला, कथा, विविध विषयांवर माहीती यात वेळ कसा संपला कळलेच नाही. अतिशय सुंदर आणि सुत्रबद्ध कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंजूषा साखरे, सविता धमगाये, सरोज वासनिक, गायत्रीताई नारनवरे, सुजाता मेश्राम, विणा गायकवाड, संध्या राऊत, मंदाताई आगरे यांनी विशेष परिश्रम घेतले.





