*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट बारा🎗🎗🎗*
*☄विषय : स्वप्नपूर्ती☄*
*🍂शनिवार : १७ / मे /२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*स्वप्नपूर्ती*
धरेवरच्या स्वर्गाला
नजर कुणाची लागली
थंड अशा बर्फात ही
आग असे जागली..!!
शांततेचे वारे इथले
उडवून कुणी हो नेले
द्वेषाच्या वणव्यात या
जळून कित्येक मेले..!!
निसर्गाची मुक्त उधळण
पर मनी नसे प्रफुल्लता
वाढेल का हो अंगणी या
कधीतरी ती मंगललता??
भयभीत त्या नजरा
नि थरकाप क्षणाक्षणाला
येईल का सांगा स्थिरता
निष्पाप जीवांच्या मनाला?
सौख्याचे घन यावे वरती
पावन व्हावी कश्मीरधरती
होईल का देशबांधवांनो
सांगा अमुची ही स्वप्नपूर्ती?
*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿〽️🔖〽️➿➿➿➿
*स्वप्नपूर्ती*
ठरवावे लागतात,
स्वप्न स्वप्नपूर्तीसाठी.
जोड असावी लागते,
परिश्रमाची त्यांसाठी. (१)
ध्येय पूर्ण करण्यास,
स्वप्न बघावे लागते.
ध्येय प्राप्तीचा आनंद,
कुठे मिळत नसते. (२)
स्वप्नपूर्ती प्रत्येकाची,
कमी अधिक होतेच.
आहे त्यात समाधान,
स्वप्नपूर्ती असतेच. (३)
एखाद नसे जवळ,
का करावी चिंता त्याची.
स्वीकार करून त्याचा,
सुख मानुन घ्यायची. (४)
स्वप्नपूर्ती शक्य नाही,
मनुष्य जन्म असाची.
एक मिळत असता,
करे हावं दुसऱ्याची. (५)
सुटणार नाही लोभ,
कधीच या माणसात.
स्वप्नपूर्ती शक्य नसे,
पुढील सात जन्मात. (६)
नका दुःख सोसू तुम्ही,
स्वप्नपुर्ति रे करण्या.
आनंद घ्या जीवनाचा,
मनी समाधान होण्या. (७)
*डॉ. बालाजी राजुरकर* *हिंगणघाट, वर्धा*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿〽️🔖〽️➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*स्वप्नपूर्ती*
स्वतःसाठी जगताच आलं
नाही तिला कधी
कायम दुसऱ्यांच्या
हाकेला ती उभी
केवळ झटणे, झुरणे
हेच केवळ तिच्या नशिबी
तिच्या अस्तित्वाची कधी तिला
निर्माण करता आली नाही छबी
मुळातच तिच्या असण्याचा
नव्हता कुणाला आदर
वरवर हसण्या मागे तिच्या
लांबलचक दुःखाची झालर
तरीपण ध्येयवेडी होऊन
रात्रंदिन झटली मुलांसाठी
स्वतःची नाही पण तिच्या
मुलांच्या स्वप्नपूर्तीसाठी
परिस्थितीवर मात करणारी
माय ती त्यागाची जणू मूर्ती
झुंजली नशिबाबरोबर
पूर्ण करण्या स्वप्नपूर्ती
पूर्ण करण्या स्वप्नपूर्ती
*सौ स्नेहल संजय काळे*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
*फलटण सातारा*
➿➿➿➿〽️🔖〽️➿➿➿➿
*स्वप्नपूर्ती*
हिंदवी स्वराज्य स्थापून
मातेची केली स्वप्नपूर्ती
जगात एकमेवाद्वितीय
होते राजे शिव छत्रपती.. //
साक्षात रुद्रावतारी जणू
हा अवतरला त्रिनेत्रधारी
सिंहगर्जना ध्वनी निनादे
सह्याद्रीच्या कडे कपारी..//
तो आलमगिर शहेनशहा
चकीत झाला दिल्लीपती
कौन शिवा दख्खनी चूहाॅ
भर दरबारी केली दर्पोक्ती.. //
खवळले मोगली रूधिर
करण्या शिवाला जेरबंद
अफजल,शाहिस्ता,सिद्दि
रथी महारथी झाले गारद..//
व्यर्थ झाल्या घोर वल्गना
ना चालली मात्रा शक्तीची
कामी आला गनिमी कावा
ना कळे कल्पना युक्तीची…//
धैर्य धुरंधर दूरदृष्टी धोरण
केला तह पुरंदर मुक्कामी
धूर्त चतुर मिर्झा राजाची
कुटनिती ठरली कूचकामी.. //
केली ख्याती आग्रा भेटीत
मोगल मती झाली कुंठीत
झोप उडवून दिल्लीश्वराची
झेप घेई सह्याद्रीच्या कुशीत..//
बाजी, तानाजी, मोरारजी
कैक मावळे प्रती शिवाजी
स्वराज्यासाठी अमर झाले
पर शान राखली भगव्याची.. //
अशी कोणती असेल का
सांगावी विश्वात स्वप्नपूर्ती
मराठ्यांचा काळजावरती
ही कोरलीय वंद्य शिवमूर्ती… //
*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿〽️🔖〽️➿➿➿➿
*स्वप्नपूर्ती*
सजणी अशा अवेळी
याद तुझी का आली
तुझिया चाहुलवेळी
पावले इथे थबकली
तुजला काळीज कोंदण
कधीच मी तर दिधले
ते गालावरचे गोंदण
मन तिथेच मम रमले
तू अशी क्षणाक्षणात
व्यापूनी मम देहाला
अवघ्याच अंतरंगात
उरलीस दरवळात
चाफ्याच्या झाडाखाली
जे स्वप्न आपण विणले
ते स्वप्न, पंख लेवूनी
फुलपाखरू कसे झाले
स्वप्नपूर्ती ही जाहली
आज या चांदण वेळी
तुझ्या नी माझ्या प्रीतीची
रंगली आगळी कहाणी
लागली ओढ जीवाला
या अवेळी अधिरशी
फांदीवर बांधलेला
हलकेच झुलाही झुलला
सहवास तुझा हवासा
क्षण उत्सवची व्हावा
बकुळीचा गंध असा
तुलाच लेवूनी यावा
नक्षत्र मण्यांत सामावूनी
भिनलीस मम रोमरोमी
अस्तित्व तुझे ही आता
गर्द गर्द मम अंतर्यामी
*वृंदा(चित्रा)करमरकर*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿〽️🔖〽️➿➿➿➿
*स्वप्नपूर्ती*
स्वप्नपूर्तीचा अद्भूत तो सोहळा
अनुभवला याची देही या डोळा
सर्व संकटाचा करून मुकाबला
यशाची वेल भिडली आभाळा
लक्ष्मीने जरी पाठ फिरवली
सरस्वतीचा सदा वरदहस्त
चिमटे बसतच पोटाला तरी
झालो ना लक्ष्यापासून परास्त
राब राब राबणारे जन्मदाते
डोळो डोळी मला दिसायचे
एकच ध्यास उरात धगधगत
या अंधकारातून बाहेर पडायचे
जिद्द चिकाटीने पेटलो असा की
लोखो सुर्य तेजाळाले उरात
निराशेचे ढग भस्मसात करत
चांदण्यांची पखरण दिनरात
अखेर उगवली ती सुवर्णप्रभा
सोनपावले उमटवून जीवनी
स्वप्नपुर्तीचा हा मंगलदिन
अर्पण जन्मदात्यांच्या चरणी
*✍️श्री अरविंद उरकुडे, गडचिरोली*
*©मुख्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿〽️🔖〽️➿➿➿➿
*स्वप्नपूर्ती*
कर्तव्याचा घाम गळू दे,जीवनी घनघोर।
स्वप्नपूर्ती होण्यासाठी,कर्म करावे थोर।।
ध्येय निश्चित बाळगून,आयुष्य हे जगावे।
अपयशाला पचवून,यशाकडे चालावे।।
वळणे येतील हजार, दिशाला सोडू नये।
ठोकरे खाल्ली तरी पायाने गोटे फोडू नये।
काळ थांबणार नाही,आराम हराम आहे।
संधीचे सोने करू ,अंती म्रुत्युच विराम आहे।।
राग व्देष ईर्षेला मनात कधीही आणू नये।
माणसाने माणसाशी, अहंकाराने ताणू नये।।
द्रुढ निष्ठा असावी स्वतःच्या मनगटावर।
यशश्री पायीची दासी तेथेच त्या पटलावर।।
*गोवर्धन तेलंग*
*पांढरकवडा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿〽️🔖〽️➿➿➿➿
*स्वप्नपूर्ती*
काव्यवाचनाची स्पर्धा
जागर मायमराठीचा
कव्यासंग्रहाचे प्रकाशन
मेळा भरला कवींचा
मराठी सक्षमीकरण
ध्यास घेतला साऱ्यांनी
ही बातमी पसरली
महाराष्ट्रात वाऱ्यांनी
दिग्गज काव्यरत्न
घेऊन ध्यास मनी
गोड गायल्या कविता
साऱ्यांची मंजुळ वाणी
साऱ्याच काव्यविरांची
काव्य होते समर्पक
कुटुंबा समवेत ऐकत होते
ध्यान देवून प्रेक्षक
विषय होते अद्भुत
ऐकून गेले भान हरपून
सविता ताईचे सूत्रसंचलन
स्वप्नपूर्ती होऊन दूत
एकाच वाटेवर भ्रमण
राहुल सरांची तळमळ
काव्य संग्रह प्रकाशित
साऱ्यांना मेहनतीचं फळ
विष्णू दादांचा आटोपशीर
कार्यक्रमचा ध्यास
अभिजात मराठीचा
महाराष्ट्रभर गाजावाजा खास
स्वाती ताई मराडेची
वाणी जसे झऱ्याचे पाणी
साधं सोज्वळ रूप त्यांचं
त्यांच्यासमान समूहात ना कोणी
*सौ. सुरेखा रा.चित्ते*
*श्रीवर्धन जि. रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿〽️🔖〽️➿➿➿➿
*स्वप्नपूर्ती*
सुंदर जिवन जगण्यासाठी
लागतो पराकाष्ठा प्रयत्नांची
आत्मबल जातो वाढत
इच्छा पूर्ण होतो स्वप्नपूर्तीची
मेहनतीने मिळतो फळ
कष्टाने मिळतो अन्नपाणी
चिकाटीने वाढतो आत्मबल
हीच जिवनाची संजिवनी
नको काया नको माया
संयमपणा बाळगा मनातून
जे आहे आपल्यापाशी
त्यालाच ठेवा जपून
यशाच्या मागे धावता
पाय जातात झिजून
अरे जे असते मनातले
ते तसेच जातात राहून
कष्टानेच होतात स्वप्न पूर्ण
जिवनात फुलत असतो स्वर्ण
संसाराची वेल जातो वाढत
त्याला सुंदर फुले जातात लागत
स्वप्नपूर्ती करण्या बहुधा
जिद्द चिकाटी हवा मनोबल
रक्ताचा बनवून पाणी
सुंदरशा जिवन बनतो अनमोल
*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿〽️🔖〽️➿➿➿➿
*स्वप्नपूर्ती*
स्वप्नपूर्तीसाठी / करावे प्रयत्न
नाही पुत्ररत्न/ प्रसादाने
कर्म आहे हाती/ कष्ट उचलावे
नेहमी झटावे/ सत्यासाठी
उघड्या डोळ्यांनी/ स्वप्न निरंतर
कासया अंतर/कष्टासाठी
नको मोह, माया/ जळे अहंकार
नौका लागे पार/यशाचीया
पाळण्यात पाय/ दिसे बालकाचे
बोल कौतुकाचे / सर्व ठायी
घालावे संस्कार/ वयी येता बाळ
कसा येई काळ/ कोण जाणे
स्वप्नपूर्ती होण्या/दाखवावा मार्ग
उगा नाही स्वर्ग/ कोणा भेटे
*डॉ. संजय भानुदास पाचभाई नागपूर*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿〽️🔖〽️➿➿➿➿
*स्वप्नपूर्ती*
प्रत्येकाचं स्वप्न असतं
स्वतःच घरदार असावं,
लेकराबाळा आपल्या
निवारा म्हणून थाटावं…१
रंगवतांना स्वप्न घराचे
होई आर्थिक नियोजन,
बांधकाम चालू असता
राबतात घरचे सारेजण…२
सजवून घरदार अंगण
प्रसंगी थाटात उद्घाटन,
जमतात वास्तूशांतीला
शुभेच्छा देई आप्तजन…३
नकोत नुसत्याचं भिंती
असतो नाती जिव्हाळा,
जपतात सारे एकमेका
वाढतो नात्यात गोडवा…४
स्वप्न साकार करतांना
जरी कष्ट बहू लागतील,
स्वप्नपूर्ती होता घराची
सारे आनंदात न्हातील…५
*✍️बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿〽️🔖〽️➿➿➿➿
*स्वप्नपूर्ती*
मनात रुजवून एक स्वप्न
त्याला प्रेमाने जपलं
खत पाणी खालून
मनगाभारी वाढवलं
यशोशिखर गाठण्या मग
निवडली परिश्रमाची वाट
प्रयत्नांच्या पराकाष्ठानी
पार केला कठीण घाट
जिद, चिकाटी अन् सातत्याचा
हा अविश्रांत प्रवास
स्वप्नांना सत्यात उतरविणे
अहोरात्र मनी एकच ध्यास
घवघवीत यश घेऊन
आला मग दिन सोनियाचा
स्वप्न सत्यात उतरलं…
अभिमानाने सांगण्याचा
प्रयत्नांती परमेश्वर…
खरा ठरला विश्वास
स्वप्नपूर्ती चा झाला सोहळा
परिश्रमाने यश मिळतेच हमखास.
*सौ. इंदू मुडे, ब्रम्हपुरी/चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿〽️🔖〽️➿➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖



