
0
4
0
8
9
0
नवांकुर
काळ्या मायची मशागत
होते पेरणीच्या अगोदर,
ओल्या मातीच्या कुशीत
फुटे गर्भात नवांकुर.
पावसाचा शिडकावा
पुरेसा आहे बिजाला,
ऊब मातीची मिळता
फुटे धुमारे अंकुराला.
धग उन्हाची शमली
झाली कासावीस धरणी,
आतुरली आकाशभेटीला
व्हावी, पावसाची करणी.
झाली तहानेने व्याकुळ
वृक्षवेली आणि पशुपक्षी,
पहिल्या पावसाचा थेंब
झेलितो चातक पक्षी.
काळे काळे ढग
आले भरून भरून,
टक्कर होता वाऱ्याची
आले पहा ढासळून.
मायादेवी गायकवाड
मानवत परभणी
0
4
0
8
9
0





