शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना
*संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धा*
????
*मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*
????
*????मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
????
*????????????सर्वोत्कृष्ट दहा????????????*
*विषय : तो चेहरा
*
*????शनिवार : ०९/ नोव्हेंबर /२०२४*????
????????????
*तो चेहरा*
मखमली तो चेहरा
मलमली मलमली
चंद्र आकाशीचा
दाखवी खळी गाली
खुले बिनधास्त
गाली हास्य लाली
मोती बिखरती
शब्दनाद सुरीली
नयन कटाक्ष
कशास हवी बोली
ह्दय क्षणार्धात
होई वर खाली
कवीची कल्पना
कि मुर्त देहबोली
लालेलाल शब्दात
घायाळ का झाली
प्रतिमा मनात
घर करून बसली
नसे वास्तवात
स्वप्नात सजली
*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
️
️
️
️????????????
️
️
️
️
*तो चेहरा*(अष्टाक्षरी)
तुझा तो चेहरा सखे
रोज वाचतो नव्याने
जवळीक असो सदा
नवे शोधतो बहाणे
तुझे पाणीदार डोळे
वाटे अजून रहस्य
गालावर खळी दिसे
ओठांवर स्मित हास्य
नाक धारदार तुझे
लगतच तिळ एक
झुकलेले डोळे सांगे
तुझे लाजणे गं नेक
तुझा तो चेहरा सखे
वाटे मज कादंबरी
रोज नवा उलगडा
जश्या तारका अंबरी
तुझ्या गं चेहर्यावर
खुललाय इंद्रधनू
मन भासे सप्तरंगी
डोळे गं लोलक जणू
*डॉ. संजय भानुदास पाचभाई नागपूर*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
️
️
️
️????????????
️
️
️
️
*तो चेहरा*
अखेर तुजपाशी संपला
मला होता ज्याचा शोध
“तो चेहरा” हाच आहे
याचा झाला क्षणात बोध.. //
मी कल्पनेच्या कुंचल्याने
एक स्वप्नचित्र रेखाटलेले
काळजाच्या कागदावर
तेच आजपर्यंत जपलेले.. //
रेषा आणि रेषा तंतोतंत
तुझ्याशी जुळूनी आले
कैक दिसांच्या प्रतिक्षेचे
जणू असे साफल्य झाले.. //
हे संगमरवरी देहशिल्प
ज्याची असंभव तुलना
तोच तो चेहरा बोलका
जी तूच लाजबाब ललना.. //
कसा वर्णन करू महिमा
तू स्वर्गीय सौंदर्यचा ठेवा
ऐक सखे माझीही आता
तू झालीस दर्द तूच दवा.. //
हवा आता तूझाच मला
अभंग अखंड सहवास
ह्रदय पाकळी खुली कर
जन्मकैद दे या भ्रमरास.. //
*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
️
️
️
️????????????
️
️
️
️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ३.०० पूर्वी पाठवावे.*
????
*तो चेहरा*
“माणूस दाखवतो
आनंदी तो चेहरा ”
“दुःख लपवून होतो
मग कावरा बावरा ”
“माणूस दाखवतो
तो चेहरा दुःखी ”
“संकटात सापडला
तरी तो हसतमुखी ”
“कधी नेता दाखवतो
तो चेहरा आत्मविश्वासाचा ”
” नसतानाही मागे बळ
नारा देतो विजयाचा ”
“वृत्तनिवेदक दाखवतो
तो चेहरा हसतमुख ”
“घरी, कुटुंबात कितीही
असली संकटे, दुःख ”
“असे अनेकविध चेहरे
जीवनात आपण बघतो ”
“पण खरा तो चेहरा
माणूस लपवूनच ठेवतो ”
*श्री हणमंत गोरे*
*मुपो :घेरडी, ता :सांगोला, जि :सोलापूर*
*(©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह )*
️
️
️
️????????????
️
️
️
️
*तो चेहरा*
तो चेहरा तुझा हसरा
डोळ्यातील ते भाव
आजही मज ओठावर
प्रितफुला तुझेच नाव
गजबजलेले ते शहर
आणिक तुझा सहवास
लाघवी तुज बोलणं
भरवायचा कधी घास
गप्पा रंगता तुझ्या माझ्या
वाटायचा हर्ष मज उरी
भेटीअंती मन धुंद होई
प्रित झळके हृदयांतरी
हृदय कप्यात जतन सारे
तुझ्या सहवासातले ते क्षण
तो चेहरा ती प्रितभरी नजर
भूतकाळ पुसेना वेडे हे मन
आता नाही ना परतून ते
पुन्हा प्रिया सुखद क्षण
फक्त आता तुझे भास नि
जगण्यासाठी तुझी आठवण
*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
️
️
️
️????????????
️
️
️
️
*तो चेहरा*
*उज्ज्वल भाग्याच्या रेषा मिटवाया,*
*आपुलेच संबंधी वळवळती …*
*तेव्हा तेव्हा दिसू लागे “तो चेहरा”,*
*नित्य आपुल्याच अवतीभोवती…धृ*
नसतांनाही जरी नात्यागोत्यांचे,
देऊन गेलेत सदैव आधार…
रक्तातले ते सगेसोयरे हो,
पळती संकटी घेऊन माघार…
*कुणा म्हणावे येथे कुणा आपुले?,*
*कुणा म्हणावे सांगा सगे सोबती?…१*
*तेव्हा तेव्हा दिसू लागे “तो चेहरा”,*
*नित्य आपुल्याच अवतीभोवती…*
कुणी गेलेत देऊनिया मदत,
कुणी गेलेत खोदूनिया कबर…
केसाने गेलेत कापूनिया गळा,
नाही लागू दिली मुळीच खबर…
*प्रसंगान्वये डाव मांडून जाते,*
*खोट्यानाट्या खटल्यांमध्ये गोवती…२*
*तेव्हा तेव्हा दिसू लागे “तो चेहरा”,*
*नित्य आपुल्याच अवतीभोवती…*
धावून आले केक दूर दूरचे,
दूर दूर गेले जे होते जवळचे…
शब्दांच्या जाळ्यात गुंफून गेलेत,
मतलबी लोकं आपुल्या घरचे…
*कोण मरतोय कोण जगतोय,*
*कुणा काही देणे न लागे पावती…३*
*तेव्हा तेव्हा दिसू लागे “तो चेहरा”,*
*नित्य आपुल्याच अवतीभोवती…*
चेहऱ्यावर चेहरे चढवून,
बनवाबनवीचा डाव खेळती…
संधी मिळताच मान मुरगळी,
आपुलीच तिजोरी भरू लागती…
*”सुधाकरा” संधी साधे संधीसाधू,*
*फिरतांना आपुल्याच हो भोवती…४*
*तेव्हा तेव्हा दिसू लागे “तो चेहरा”,*
*नित्य आपुल्याच अवतीभोवती…*
*तेव्हा तेव्हा दिसू लागे “तो चेहरा”,*
*नित्य आपुल्याच अवतीभोवती…*
*सुधाकर भगवानजी भुरके आर्य नगर नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह नागपूर*
️
️
️
️????????????
️
️
️
️
*तो चेहरा*
अनोळखी होता तसा
माझ्यासाठी तो चेहरा
वागणुकीतून आपलेपणा
आपलसं करण्याची तऱ्हा
आयुष्याच्या या वळणावर
मिळत गेला अवचित सहवास
आश्वासक नजरेचा भाव
असा गुंतून गेला श्वास
एक धागा एक नाते
जुळवून येती ऋणानुबंध
एक आस एक विश्वास
जीवनच बदलते सबंध
कित्तेक अव्यक्त गोष्टी
कळत गेल्या नजरेतून
निरागसता इतकी होती
गेली ती मनात घर करून
एक हाक अन एक साथ
सोबत तुझी सौख्याचा क्षण
एक शब्द एक कटाक्ष तुझा
प्रेरणा देतो एक विलक्षण
*अनुराधा भुरे,नांदेड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
️
️
️
️????????????
️
️
️
️
*तो चेहरा*
माझ्या दोन्हीही चिमण्या
आता गेल्या सासरी उडून…
पण त्यांचा गोड तो चेहरा
बसलायं हृदयात दडून.…
चिमण्या येता घरा,तोच
आमचा दिवाळी दसरा…
तेव्हा कणाकणात दिसतो
आम्हा तोच तो चेहरा हसरा….
ध्यानी,मनी सदा दिसतो तो चेहरा
त्या आठवणीने मन खुदकन हसते..
क्षणात इथे तर क्षणात तिथे हृदय
पाखरू अलगद मनी वसते….
चिमण्यांचा आनंदी तो चेहरा पाहून
मन प्रफुल्लित सदा व्हायचे……
हवे तेव्हा हवे तेथे भेटीस त्यांच्या
वायूच्या वेगाने लेकीस निरोप द्यायचे…
प्रत्येकाच्या नशिबात असावा
त्यांच्या लाडकीचा तो चेहरा….
सदा प्रसन्न ठेवतो तो
आईबाबांच्या हळव्या मनमंदिरा….
*सौ स्वाती तोंडे पाटील मॅडम*
*इंदापूर पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
️
️
️
️????????????
️
️
️
️
*तो चेहरा*
*(चाराक्षरी काव्य )*
तो चेहरा
कधी हसू
तर कधी
दुःख आसू…!!
तो चेहरा
कधी माया
तर कधी
देई छाया…!!
तो चेहरा
कारस्थान
तर कधी
मानपान…!!
तो चेहरा
कधी मूक
तर कधी
घडे चूक…!!
तो चेहरा
लाखो रंग
तर कधी
स्वतः गुंग…!!
तो चेहरा
आर्त साद
तर कधी
हर्ष दाद…!!
तो चेहरा
विसरतो
तर कधी
आठवतो…!!
तो चेहरा
मुखवटा
तर कधी
नाना छटा…!!
तो चेहरा
हृदयात
तर कधी
नयनात…!!
*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षीका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
️
️
️
️????????????
️
️
️
️
*तो चेहरा*
तो चेहरा सोज्वळ
जसा पूनम चंद्रमा
गौरवर्ण रुप सुंदर
तेज देवीमूर्ती मंदिरा
लाजरा बुजरा मुखडा
नयनी खुले हास्यमुद्रा
पवित्र मन शांत
खळखळ निर्मळ झरा
शेतात राबणारे कर
पिकांची डोले वसुंधरा
बळीराजाची आहे लेक
गोरगरिबांवरी तिची माया
भाळी कुंकू ठळक
भारदस्त पदर माथा
शोभे गालावरी गोंदण
दृष्ट न लागो तिजला
*सुनीता पाटील*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
️
️
️
️????????????
️
️
️
️
????????????
*????सर्व विजेत्यांचे अभिनंदन* ????
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*????
????????????
*????????संकलन / समूह प्रशासक????????*
*राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
????????????
*????मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
????????????