Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्ररायगड

भारतमातेच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनाचा सोहळा आवासमध्ये उत्साहात संपन्न

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 5 9 0 3 4

भारतमातेच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनाचा सोहळा आवासमध्ये उत्साहात संपन्न

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

बिनधास्त न्यूज नेटवर्क

अलिबाग, (शनिवार दि. १५ अॉगस्ट २०२६) : आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळ, आवासच्या शैक्षणिक संकुलात आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळ, बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर काॕलेज, पूर्व प्राथमिक व स्वर्गीय प्रभाकर सदाशिव राणे प्राथमिक शाळा यांनी भारतमातेच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मुख्याध्यापक/प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांच्या मार्गदर्शनातून व सुनियोजनातून उत्साहात साजरा केला.

सर्वप्रथम विद्यार्थीनींच्या लेझीम पथकाने लेझीम प्रात्यक्षिक करून मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर अलिबाग तालुका पंचायत समितीच्या उपसभापती प्रिया प्रमोद भगत यांना ध्वजारोहणासाठी सहाय्यक शिक्षक अजित नाईक सर यांनी आमंत्रित केले व प्रिया प्रमोद भगत यांनी ध्वजारोहण केले.

ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रगीत झाले. त्यानंतर यतिश शिंदे सर व विशाल पाटील सर यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थीनींनी झेंडा गीत व देशभक्तीपर गीत सादर केले. त्यानंतर स्वर्गीय दिपक परांजपे यांच्या स्मरणार्थ सुनिल भोसले यांनी शैक्षणिक वर्ष २०२५ – २६ मध्ये विद्यालयातील इ. ५ वी पासून इ. १० वी पर्यंतच्या प्रत्येक इयत्ते मधून प्रथम व द्वितीय क्रमांकाचे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी रोख रक्कम स्वरुपात दिलेल्या पारितोषिकांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करून त्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी अलिबाग तालुका पंचायत समितीच्या उपसभापती प्रिया प्रमोद भगत यांनी आपले मनोगत व्यक्त केले व सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाचे कार्यकारीणी सभासद दिपक राऊळ, कार्यकारीणी सभासद जयवंत म्हात्रे, कार्यकारीणी सभासद अनिल राऊळ, अलिबाग तालुका पंचायत समितीच्या उपसभापती प्रिया प्रमोद भगत, ग्रुप ग्रामपंचायत, आवास माजी सदस्या ज्योती पवार, बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, आवासचे माजी मुख्याध्यापक/माजी प्राचार्य प्रमोद भगत सर, माजी ग्रंथपाल नथुराम म्हात्रे सर, बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासचे विद्यमान मुख्याध्यापक/प्राचार्य अनिल दारकुंडे सर, शिक्षक प्रतिनिधी यतिश शिंदे सर, स्वर्गीय प्रभाकर सदाशिव राणे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रसिका म्हात्रे मॕडम, बालवाडी प्रमुख प्रमोदिनी पाठक मॕडम, प्राथमिक विभाग शिक्षक प्रतिनिधी सुप्रिया राऊळ मॕडम, सर्व विभागातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन सांस्कृतिक समिती प्रमुख धनंजय भगत सर यांनी केले. शेवटी विद्यालया मार्फत तसेच अलिबाग तालुका पंचायत समितीच्या उपसभापती प्रिया प्रमोद भगत व ग्रुप ग्रामपंचायत, आवास माजी सदस्या ज्योती पवार, यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. विद्यालयातील कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांची शाळेपासून ग्रुप ग्रामपंचायत, आवासपर्यंत प्रभात फेरी काढण्यात आली. प्रभातफेरी मध्ये देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या. आपल्या भारतमातेचा जयघोष करण्यात आला.

प्रभात फेरी ग्रुप ग्रामपंचायत, आवास येथे पोहोचल्या नंतर सर्व प्रथम बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासच्या विद्यार्थीनींच्या लेझीम पथकाने लेझीम प्रात्यक्षिक करून मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर ग्रुप ग्रामपंचायत, आवास सरपंच अभिलाषा अभिजीत राणे यांना ध्वजारोहणासाठी बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासचे सहाय्यक शिक्षक अजित नाईक सर यांनी परेड करून आमंत्रित केले व सरपंच अभिलाषा अभिजीत राणे यांनी ध्वजारोहण केले. ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रगीत झाले. त्यानंतर यतिश शिंदे सर व विशाल पाटील सर यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थीनींनी झेंडा गीत व देशभक्तीपर गीत सादर केले. त्यानंतर प्रतिज्ञा म्हणण्यात आली.

त्यानंतर स्वर्गीय प्रभाकर सदाशिव राणे प्राथमिक शाळेतील इ. ४ थी चा विद्यार्थी मिहीर प्रकाश जानकर याचे भाषण व इ. ४ थी मधील विद्यार्थीनींचे देशभक्तीपर गीतावर अतिशय सुंदर असे समूह नृत्य सादर झाले. त्यानंतर बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासच्या इ. ६ वी व इ. ७ वी मधील विद्यार्थीनींनी देशभक्तीपर गीतावर अतिशय सुंदर असे समूहनृत्य सादर केले. दोन्ही समूह नृत्यातील विद्यार्थीनींना ग्रुप ग्रामपंचायत, आवास सरपंच अभिलाषा अभिजीत राणे यांनी २००० रुपये पारितोषिक दिले.

या कार्यक्रमास ग्रुप ग्रामपंचायत, आवास सरपंच अभिलाषा अभिजीत राणे, अलिबाग तालुका पंचायत समितीच्या उपसभापती प्रिया प्रमोद भगत, ग्रुप ग्रामपंचायात, आवास माजी सरपंच व विद्यमान सदस्य अभिजीत प्रभाकर राणे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी जयेश पाटील, आवास गावच्या पोलिस पाटील श्रेया म्हात्रे, आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाचे कार्यकारीणी सभासद सुधाकर राणे, कार्यकारीणी सभासद दिपक राऊळ, कार्यकारीणी सभासद अनिल राऊळ, बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासचे माजी मुख्याध्यापक/माजी प्राचार्य प्रमोद भगत सर, बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासचे विद्यमान मुख्याध्यापक/प्राचार्य अनिल दारकुंडे सर, शिक्षक प्रतिनिधी यतिश शिंदे सर, स्वर्गीय प्रभाकर सदाशिव राणे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रसिका म्हात्रे मॕडम, बालवाडी प्रमुख प्रमोदिनी पाठक मॕडम, प्राथमिक विभाग शिक्षक प्रतिनिधी सुप्रिया राऊळ मॕडम, सर्व विभागातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी तसेच सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य केंद्रातील कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी आणि मोठ्या संख्येने आवास ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन सांस्कृतिक समिती प्रमुख धनंजय भगत सर यांनी केले. शेवटी सर्व उपस्थितांना ग्रुप ग्रामपंचायत, आवास यांच्या मार्फत खाऊचे वाटप करण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 9 0 3 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे