
0
6
3
9
6
0
दिव्याची आरास
दिवाळी आली, दिवाळी आली
आनंदाची पहाट झाली
घरोघरी सडा-रांगोळी
दारोदारी फुलं-माळा सजली
अंगण सारवलं छान
रांगोळी काढली छान छान
लाल-पिवळा-हिरवा रंग
त्यात मोर, कमळ, फुल छान
दारात आंब्याचं तोरण
झेंडूच्या फुलांचा हार
लक्ष्मी येणार घरात
म्हणून सजवलं दार
भिंतीवर लावली झुंबरं
लाइट्सची माळ अन् सुंदर
रात्रीच्या अंधारात घर
जणू ताऱ्यांचंच नगर
पणत्यांची रांग अंगणात
तेल वातीचा सुगंध दरवळत
एका पणतीने दुसरी पेटवली
जणू मैत्रीची ज्योत राहिली जळत
प्रतिमा नंदेश्वर
ता. मूल, जि.चंद्रपूर
0
6
3
9
6
0



