
0
4
0
9
0
3
श्रावणातला सरंजाम
भात -वरण, साजूक तूप
देई मनाला संतोष खूप
श्रावणमासी न होई त्रास
अधून मधून करा उपवास
सणवारांचा व्रतवैकल्याचा
झोका फुगडी झिम्मा खेळण्याचा
असे हा माह खास
पहिली मंगळागौर करण्या
लेकी येती माहेरास
दैवादिक देती दर्शन
करता मनापासून पूजन
नागपंचमी नारळी पौर्णिमा
रक्षाबंधनदिनी सुग्रास भोजन
लगोलग येतो पोळा सण
वृषभराजांचा विश्रांती क्षण
नैवेद्य त्यांना पुरणपोळी
वरून साजूक तुपाची धार
कटाच्या आमटीचे झणझणीत सार
पोट भरते तुडुंब फार
तांबूलविडा करी त्यावर मात
ऐसा सरंजाम फक्त श्रावणात
बी.आर. पतंगे (beeke)
जि.अहिल्यानगर
========
0
4
0
9
0
3





