0
4
8
2
9
7
कविता
नजरेने धोका खाऊ नये
माणसे पारखणे शिकावे॥
अंतरंग जाणावे माणसांचे
पाहू नये वरवरचे दिखावे॥॥॥॥
मुखवट्यावर मुखवटा घालून
लोक वावरती या जगीं॥
खरा चेहरा कोणता
हे नेमकेपणाने बघावे॥॥॥॥
जग अभिनय निपुणं
त्याचे फसवे अविर्भाव॥
त्याची सत्यासत्यता पडताळावी
अकारण कां म्हणून फसावे?
लीलया फशी पडू नये
अंगी बाळगावे चातुर्य॥
जागवूनी सारासारविवेक
पुढे पाऊल टाकावे॥॥॥॥
फक्त मनाचे ऐकू नये
घ्यावा बुध्दिचाही सल्ला॥
राहून अष्टौप्रहर दक्ष
हे भवसागर तरावे॥॥॥॥
डाॅ.नझीर शेख राहाता
जि.अहमदनगर
0
4
8
2
9
7



