0
4
8
2
9
7
पडद्याआड
जीवनरूपी रंगमंचावर
असतो आपण मिरवत
कुणीतरी दिलेले धडे
असतो मुखोद्गत गिरवत..//
जी मिळेल ती भूमिका
करावी लागते साकार
पडद्याआड राहून कुणी
त्यास देत असते आकार… //
काळे,गोरे,कुरूप,सुंदर
व्यर्थ कुणी श्रेय घेणार
कर्ता करविता तोच एक
अलग रंग रूप देणार… //
इथे सुप्त कला गुणांचा
घडवत रहावे अविष्कार
भूमिकेस न्याय देणारा
बनावे गुणवंत कलाकार.. //
सुख, दुःख, राव, रंक
तो सर्व काही ठरवणार
यथावकाश योग्य वेळी
भूमिकाही बदलणार..//
विष्णू संकपाळ
जि.छ. संभाजीनगर
0
4
8
2
9
7



