निरवाना बहुउद्देशीय संस्थेतर्फे बौद्धिक परीक्षेचा पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात
जिल्हा प्रतिनिधी नागपूर
निरवाना बहुउद्देशीय संस्थेतर्फे बौद्धिक परीक्षेचा पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात
नागपूर: (दि २३) निरवाना बहुउद्देशीय संस्था नागपूर यांनी आयोजित केलेल्या बौद्धिक परीक्षेचा निकाल आणि बक्षीस वितरण सोहळा दिनांक २१ मे रोजी त्रिरत्न नगर, नारा रोड येथील सांस्कृतिक भवन येथे उत्साहात संपन्न झाला.
यावेळी प्रमुख अतिथी मा.महेश जोशी, मनसेचे प्रदेश सरचिटणीस, जनहित कक्ष नागपूर हे उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात विश्ववंध्य महाकारूणीक भगवान गौतम बुद्ध तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला दमयंतीबाई मेश्राम, दिगंबर चनकापुरे यांच्या हस्ते माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले .
कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्राजक्ता खांडेकर निर्माती, लेखिका ,गीतकार कस्तुरी फिल्म एंटरटेनमेंट वर्ल्ड यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार निरवाना बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मा. नितेश मेश्राम यांनी मानले.
याप्रसंगी ६ ते १२ वयोगटात दहा उत्तेजनार्थक बक्षीस १३ ते १७ वयोगटात तीन बक्षीस व सात उत्तेजनार्थ बक्षीस तसेच १८ च्या वर वयोगटातील तीन क्रमांकाचे पुरस्कार तसेच सात उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. यात प्रथम पुरस्काराचा मानकरी सौरभ संदेश सतदेवे, द्वितीय पुरस्काराचे मानकरी रोहित विजय फुलझेले व सचिन भास्करराव नंदेश्वर आणि तृतीय क्रमांकाच्या मानकरी सौ.शारदा भालचंद्र मडके हे ठरले आहेत.
संस्थेच्या वतीने आशिष मेश्राम, प्रफुल नवनागे, अमर बोदेले, मनीषा खापर्डे , भारत खापर्डे, ज्योती मेश्राम, चेतन घोडेस्वार, सुरेंद्र बनसोड, भूपेंद्र मेश्राम, नीहरिका मेश्राम, नीनाध्य मेश्राम, दिव्यांशी मेश्राम,मनीष कामडी, मंगेश बागडे, प्रवीण सोरदे, मयूर लांजेवार, रतनलाल खांडेकर, दिव्याता दहिवले, राजेंद्र दहिवले आणि प्राजक्ता खांडेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.



