बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धेतील रचना
मुख्य संपादक: राहुल पाटील
*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*
*🥀विषय : भावना जपू या🥀*
*🍂बुधवार : ०१/ जानेवारी /२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*भावना जपू या*
*एकमेकांच्या मदतीसाठी सारे खपू या…*
*बाजूला ठेवून मत्सर, भावना जपू या…धृ*
दुखवायचे नाही कधी कुणाचेच मन…
फुलवू चला सारे आनंदाने नभांगण…
*दिसावे साऱ्या मुखावरी आनंदे हसू या…१*
*बाजूला ठेवून मत्सर, भावना जपू या…*
नववर्षी संकल्प करू प्रेमज्योत लावू…
मानवता दृष्टिकोन मनोमनी रूजवू…
*कधी कुणाच्या डोळ्यात न यावेत आसू या…२*
*बाजूला ठेवून मत्सर, भावना जपू या…*
दुखावेल मन ऐसे शब्द न यावे मुखी…
व्हावे भले सर्वांचे कुणी नसावेत दुःखी…
*स्वर्गसुख काय आहे मृत्यू लोकी पाहू या…३*
*बाजूला ठेवून मत्सर, भावना जपू या…*
नको कठोर वाणी नसो कुठे बेइमानी…
नको हिंसा,नको द्वेष असावे समाधानी…
*”सुधाकरा”* प्रेमभावे नित्य एक राहू या…४
*बाजूला ठेवून मत्सर, भावना जपू या…*
*सुधाकर भगवानजी भुरके आर्य नगर, नागपूर*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह नागपूर*
♾️♾️♾️♾️💕💙💕♾️♾️♾️♾️
*भावना जपू या*
भावनाशून्य झाली माणसं
तयाला भानावर आणू या,
प्रेम जिव्हाळा माया ममता
त्यांच्यात निर्माण करु या…
सोयर सुतक कुणाचे कुणा
राहीले नाही काही देणेघेणे,
निगरगट्ट काळजाची कशी
अवघड जाईल समजावणे…
नव्या वर्षाचा नवा संकल्प
प्रेरक सुविचार पेरणी करू,
मानवतेच्या कल्याणासाठी
विचार परिवर्तन कास धरु…
काळीज हेलावणारी घटना
खूपदा मन सुन्न होते ऐकून,
विपरीत बुद्धी मुळात यांना
कशी काय सुचतेय कोठून…
हृदयातल्या भावभावनांना
वाट मोकळी करत राहू या,
सुखदुःखात सहभागी होत
हेवेदावे विसरून जाऊ या…
वैरभावना दुर सारूनिया
प्रेम,मैत्री,बंधूभाव जपू या,
अंतर्मनातील दुःख दडवून
परस्परांचे भावना जपू या…
*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💕💙💕♾️♾️♾️♾️
*भावना जपू या*
एकमेका प्रेम करू या
मना मनाच्या भावना जपू या
जीवन एक क्षणभंगुर
प्रेमाची कास धरू या||धृ||
नको उगाच पायखिची
बंधूतेच्या खिल्या उडविती
जप रे मानवा ही नाती
सोडू नको आपली निती||१||
नाळेची वीण गेली विणली
जुळली गेली रेशीम गाठी
मुलायम चादर मखमली
आंतरली या भुवरी||२||
तन मनाचे नाते जुळले
भाव भावनांचे शिंपले बनले
सुख दुःखाचे अश्रू टिपले
जन्म धन्य पावन झाले||३||
अहंकाराचा झाला जन्म
मीपणाने झाला तुच्छ
स्वतःला मिरवू लागला उच्च
पकडू लागला इतरांचे गच्छ||४||
मृत्यू आहे सर्वांचा शेवट
सोड माणसा ईच्छांचा सावट
प्रेमाने प्रेमाशी नाती जोडू या
मनामनाच्या भावना जपू या||५ ||
*रंजना राहुल ब्राह्मणकर*
*अर्जुनी/मो.जि.गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💕💙💕♾️♾️♾️♾️
*भावना जपू या*
गंगामाता तुज नमो नमो
भागीरथाने पाठवली स्वर्गातूनी
श्रीशंकराने माथा झेलली
पावन नद् शितल जीवनी
नागमोडी क्षेत्री सेवाभावी
ॠतूआगमन चैतन्य निर्मिती
वृक्ष लव्हाळी सांभाळीती
जीवजंतू आनंदे रक्षती
भक्तांची पापं प्रक्षालती
शहर-गावांचे जपती नाती
तृष्णा शमविते पिके पिकवती
दुनियेची साऱ्या आवडती
भावना जपू या दुःखहरणीची
प्लास्टिक निर्माल्य न टाकूनी
पाहू सुंदर-नितळ अलंकार ल्यालेली
*सुनीता पाटील*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💕💙💕♾️♾️♾️♾️
*भावना जपू या*
भावना जपूया तयांच्या….
जे जपतील आपल्या भावना
नकळत डोकावतील ह्रदयात
अन् उमजतील मनीच्या वेदना
भावना जपू या तयांच्या …..
नसतांना कोणतेही नाते
संवेदनांनी असतील जोडलेले
समजतील हास्यातील वेदनेचे खाते
भावना जपू या तयांच्या…..
उडण्या उंच आकाशी
देतील पंखांना बळ
स्वार्थ न बाळगता मनाशी
भावना जपू या तयांच्या……
समजून काळ वेळ आगळी
साथ देण्या सोबत उभा
भासतील आपलीच सावली
भावना जपू या तयांच्या…..
आनंदात आनंदी नजर
दुःखात आधाराची काठी
अन् देता हाक होती हजर
भावना जपू या तयांच्या..
*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💕💙💕♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*भावना जपू या*
व्यर्थ खटाटोप कशासाठी
इथे एकमेकांसाठी खपूया
कामना पूरी होवो ना होवो
परस्परांच्या भावना जपूया.. //
प्रेमात आणि युद्धात म्हणे
सारे काही असतेच माफ
तसेच चूक भूल देणे घेणे
मन मात्र कायम हवे साफ.. //
इथे कुणाच्या अंतर्मनाचा
लागत नसतोच थांगपत्ता
उगाच गाजवता येत नाही
कुणावरही मनमानी सत्ता.. //
कुणालाही गृहीत धरणे
बिल्कूल चूक ठरू शकते
मौन म्हणजे मूक संमती
सूत्र कायम अचूक नसते.. //
माझ्या तेच त्याच्या मनी
आपल्याच मनाचा खेळ
खरे तर हेच सारे दैवाधिन
दोन जीवांचा साधणे मेळ.. //
मुक्त संवादात सुप्त असे
मर्यादेची एक लक्ष्मणरेषा
जी कुणाला बांधून ठेवते
कुणाची ठरतेय भाग्यरेषा.. //
एक दुसर्याची करू कदर
आणि योग्य आदर राखूया
प्रत्येकाचे मन मत स्वतंत्र
जशास तशा भावना जपूया.. //
*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💕💙💕♾️♾️♾️♾️
*भावना जपू या*
सद्भावना मनी ठेवून
दुःखितांचे अश्रू पुसुया
शोषित पिडीतांच्याप्रती
सह्रदयी भावना जपू या
देऊन आधार बुडत्याला
दृष्टीहीनांची दृष्टी होऊया
मुक्या बहिऱ्या दुबळ्यांना
नवचैतन्याची सुखे वाटू या
शब्दबाण नको जहरी
आपुलकीचे नाते जपू या
कुकर्माची नकोच संगत
सन्मार्गाची कास धरुया
आदरभाव हा थोरांप्रती
वाणी वाचा मधूर ठेऊया
मित्रत्वाची करुन पारख
सत्याची संगत धरुया
नववर्षाचा करुन संकल्प
तडीस तो नेण्याचे ठरवूया
असंगाशी नको ती संगत
सुविचाराने कर्म करुया
*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💕💙💕♾️♾️♾️♾️
*भावना जपू या*
घेऊनी रडण्याची सनई
माणूस जन्माला येतो
भाबडी भावना बघूनी
इतरांना आनंद होतो
शरीराने वाढलो तरी
भावनिक दृष्टीची उणीव
कोणी काही बोलले की
लगेच होते त्याची जाणीव
चुकली आयुष्याची दिशा
की उद्भवितो गोंधळ
मनाची सारी सैलफैल
तुटते भावनांची ओंजळ
लाटा जशा येतात जातात
तशाच असतात भावना
चलचित्राप्रमाणे क्षणात
जागवितात मनाच्या चेतना
जीवनाच्या व्यासंगात
मनसोक्त व्यक्त होऊया
सकारात्मक कृतीतुनी
आपल्या भावना जपूया
*कुशल गो डरंगे, अमरावती*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💕💙💕♾️♾️♾️♾️
*भावना जपू या*
नवीन वर्षाचे स्वागत करूया
समाजसेवेचा ध्यास घेऊया…
अशांत मनाला शांत होऊ द्या
आनंद वाटपाचा वसा घेऊ या…
काही वंचितांचा तरी सांभाळ करूया
वृद्धांची सेवा करण्यात रमूया…
वाचनाने ज्ञान समृद्ध बनवूया
निरक्षरांना साक्षरतेकडे नेवूया…
मनातील प्रेमळ भावना जपू या
वाईट भावनांना तिलांजली देऊ या…..
समाजात सामंजस्याने वागूया
वृक्ष लागवड करून पर्यावरण संभाळूया…
*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी, जिल्हा – पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💕💙💕♾️♾️♾️♾️
*भावना जपू या*
विचाराचा भुंगा त्याच्या
मनास पोखरतो
वाग्बाणांनी घरच्यांच्या
तो अधिकच कोषात जातो
सहजी विसरतो मग
आई बाबांचे प्रेम
खेळू लागतो मनांत
स्वतःशी ब्लेम गेम
एक अपयश परिक्षेतलं
पचनी पडत नाही
कसे कळेना त्याला त्यामुळे
तो कुचकामी ठरत नाही
अवास्तव अपेक्षांचा
भार त्याच्या डोईवर
संयमाची तुटुन दोरी
गळफास लटकतो गळ्यावर
गळफास घेऊन तो जीव
अनंतात होतो विलीन
आपले काय चुकले याच
संभ्रमात उरती पालक दीन
भावना जपू या त्याच्या
संवादाचा बांधून पूल
साधनांबरोबर थोडा वेळ दिला
तर दुरावणार नाही आपले मुल
*सौ. रजनी भागवत*
*ऐरोली, ठाणे*
*©सदस्या- मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💕💙💕♾️♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖