बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील रचना
मुख्य संपादक: राहुल पाटील
*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट दहा🌈🌈🌈*
*🥀विषय : भावना जपू या*🥀
*🍂बुधवार : ०१ / जानेवारी /२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*भावना जपू या*
एकमेकांना समजून घेऊ
आधार,मनोबल देऊ या
ॠणानुबंध जपता जपता
वात्सल्यरुपी भावना जपू या
*दत्ता काजळे,उमरगा*
*जि.धाराशिव*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌈💙🌈♾️♾️♾️♾️
*भावना जपू या*
*करू आदर एकमेकांचा*
*एकदुज्याच्या भावना जपू या*॥
*वाढण्या परस्परातील स्नेह*
*गड्या!दिनरात खपू या*॥॥॥॥
*डाॅ.नझीर शेख राहाता*
*जिल्हा अ.नगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌈💙🌈♾️♾️♾️♾️
*भावना जपू या*
मनाने दिलेला कौल ऐकूया
वागण्यात समजूतदारपणा आणूया
सहवासात विश्वासाने…
नात्यातील भावना जपुयात
*सौ.सिंधू बनसोडे.इंदापूर.पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌈💙🌈♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*भावना जपू या*
भावना जपू या बायकोच्या
मोल जाणून तिच्या कष्टाचे
मदत करुन घरकामात
बोला हो दोन शब्द प्रेमाचे.
*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि. अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌈💙🌈♾️♾️♾️♾️
*भावना जपू या*
जोडत नाती मनामनामधील
भावना जपू या आपुलकीची
आत्मभान जागविणारी अंतरी
जाणीव असावी माणुसकीची
*सचिन पाटील*
*अलिबाग, रायगड*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌈💙🌈♾️♾️♾️♾️
*भावना जपू या*
गरीब असो वा दुबळा
साऱ्यांचाआदर करूया
मानव सारे समान
एकमेकांच्या भावना जापुया
*श्रीमती अस्मिता हत्तीअंबिरे परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌈💙🌈♾️♾️♾️♾️
*भावना जपू या*
भावना जपू या मनातील
आपण एकमेकांच्या
साकार होतील स्वप्ने मनातील
बरसतील सरी सौख्याच्या
*श्रीमती. कल्पना गाडीलकर*
*तालुका -पारनेर*
*जिल्हा -अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🌈💙🌈♾️♾️♾️♾️
*भावना जपू या..*
भावना जपू या
बोलायला सोपा
वागताना जपावा
एकोप्याचा खोपा..
*सौ. प्रज्ञा सवदत्ती*
*गोरेगाव-रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह.*
♾️♾️♾️♾️🌈💙🌈♾️♾️♾️♾️
*चारोळी -भावना जपू या*
काही शब्द लागतात जिव्हारी
बोलतांना विचार करू या
नव्या वर्षात संकल्प करून
एकमेकांच्या भावना जपू या.
*सौ, इंदु मुडे, ब्रम्हपुरी/चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🌈💙🌈♾️♾️♾️♾️
*भावना जपू या*
षडरिपूंना देऊन तिलांजली
भावना जपू या निर्मळ मनाने
जुने पुराणे वाद विसरून
नातं टिकवू प्रेम आपुलकीने
*सौ.सुजाता सोनवणे.*
*सिलवासा दा.न.ह.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
♾️♾️♾️♾️🌈💙🌈♾️♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖





