Breaking
ई-पेपरकवितामहाराष्ट्रसाहित्यगंध

बाळराजे शिवबा

शारदा राहुल शिंदे

0 4 8 2 8 4

बाळराजे शिवबा

जिजाऊंचा लाडोबा, बाळराजे शिवबा
सवंगड्यांचा घरोबा, शत्रूला दबदबा ||१||
बाळराजे शिवबा,जिजाऊंचे संस्कार
रयतेवर केली, माया अपार||२||

पवित्र ग्रंथातील ऐकून वीरकथा,
मनी जागवली, स्वराज्य शौर्यगाथा||३||
गुरूंनी शिकवले, तलवारबाजीचे धडे,
डोंगरदऱ्या,वाटा शोधण्या, पळवले चहू घोडे ||४||

बाजी, तानाजी, येसाजी,साथीला जीवाचे मित्र
जिद्दीनेच पूर्णत्व, साकारले स्वराज्यचित्र||५||
रयतेवरील अन्यायाचा, उतरवला शत्रूचा माज
गनिमी काव्यानेच, ठेचला गनिम कावेबाज||६||

नेतृत्व,कर्तृत्व, दातृत्व, किती वर्णावे तुमचे सत्त्व
धन्य जाहले पितृत्व, धन्य ते मातृत्व||७||
शिवबा आमुचा राजा, सकल विश्वात गाजावाजा
नसांनसांत मनांमनात,तूच देव नाही दुजा||८||

शारदा राहुल शिंदे
वाई,जि. सातारा
=========

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे