0
4
8
2
9
0
भरकटलेले आम्ही
भरकटलेले आम्ही आता
आम्हा काय कुणाचे
कोण आपले कोण परके
आम्हा काय हो त्याचे?
आभासी दुनियेत रमलो
तीच आमची नातीगोती
बांधिलकी नाहीच कसली
ओळख हाय, हॅलो पुरती
वृद्धांची होते अडचण
रवानगी हो वृद्धाश्रमात
ढवळाढवळ खपत नाही
चौकोनी आमच्या कुटुंबात
फास्टफूडचा हा जमाना
घरी कोण आता रांधतो?
पिझ्झा बर्गर खाण्यासाठी
रात्रंदिवस आम्ही राबतो
भौतिक सुखाचे भोक्ते
पाहतो हित स्वत:पुरते
संस्कृतीला कोण जाणते?
राष्ट्रप्रेम बोलण्यापुरते
वृंदा(चित्रा)करमरकर
सांगली
0
4
8
2
9
0



