
0
6
6
7
2
0
प्रीत
प्रीत म्हणजे फुलांचा सुगंध,
मनांंगणातलं चांदणं…
तुझ्या एका हसण्यावर,
त्या आभाळाचं फुलणं..!
प्रीत म्हणजे न बोलता कळणं,
नयनातून हृदयी उतरणं…
तू जवळ नसतानाही,
तुझ्याच आठवणीत हरवून जाणं..!
प्रीत म्हणजे मधाचा गोडवा,
तुझ्या शब्दातला ओलावा…
रुसवा आला तरीही,
मनाला वाटणारा तुझाच ध्यास हवा..!
प्रीत म्हणजे आयुष्यभराची साथ,
हातात हात घेऊन चालणं…
सुख-दुःखाच्या वाटेवर,
फक्त तुझंच नाव जपणं..!
स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, जि.पुणे
===========
0
6
6
7
2
0



