
0
6
5
6
9
7
हवास तू…
सुखाच्या झुल्यावर
दुःखाच्या हिंदोळ्यावर
जीवनाच्या वाटेवर
सुंदर त्या वळणावर
मनाच्या पानावर
भवताली सभोवार
नित्य मज हवास तू..!
चंद्र चांदण्यात
ऊन पावसात
झुळूक वा वादळात
मनपसंत छंदात
अंतरंगी स्पंदनात
ग्रीष्म वा वसंतात
नित्य मज हवास तू..!
कधी विरह क्षणी
वसावे तू नयनात
स्वप्नातील दुनियेत
कल्पनेच्या भासात
आठवणीच्या झुल्यात
मनाच्या प्रतिबिंबात
नित्य मज हवास तू..!
स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर पुणे
======
0
6
5
6
9
7



