0
4
8
3
0
0
इंद्रधनुचे रंग
आला आला थंडगार वारा
संगे घेऊन पावसाच्या धारा
पाऊस पडून निघाले ऊन
इंद्रधनू हा पाहे डोकाऊन
इंद्रधनूची बघा सुंदर कमान
सात रंगाचा मोठाच मान
मुलांना पडले स्वप्न सुंदर
इंद्रधनुवर घेऊ झोके नंतर
बघता बघता काय झाले
इंद्रधनू हे पसार झाले
इंद्रधनूची किमया पाहण्या न्यारी
बालचिमुकले गोळा सारी
सुनंदा किरसान
अर्जुनी मोर गोंदिया
0
4
8
3
0
0



