Breaking
आरोग्य व शिक्षणनागपूरभंडारामहाराष्ट्रमुंबईराजकियविदर्भ

भारत बंद समर्थनात सहभागी झाल्या अनेक संघटना

आरक्षण बचाव देश बचाव आंदोलनात लाखोंचा जनसागर

0 4 8 2 9 7

भारत बंद समर्थनात सहभागी झाल्या अनेक संघटना

आरक्षण बचाव देश बचाव आंदोलनात लाखोंचा जनसागर

भिमराव मेश्राम, तालुका प्रतिनिधी

भंडारा/लाखांदूर: समाजात आणि देशात अजूनही समानता प्रस्थापित करण्या साठी प्रयत्न करत असताना सुप्रीम कोर्टाने संविधान अभ्यासून न घेता दिलेला निर्णय परत करण्याकरिता आणि समाजातील व देशातील एकोपा राखण्याकरिता सर्व जनता आंदोलनात सहभागी झाले.

हजारो वर्षांपासून गैर- बराबरीचे जीवन जगणाऱ्या अनुसूचित जाती – अनुसूचित जमाती वर्गाला समतेत आणण्यासाठी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक प्रयत्न केले. संविधानातील सभेत दिर्घ काळ चर्चेनंतर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती वर्गाला सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने दि. १ ऑगस्ट २०२४ रोजी असंवैधानिक निर्णय दिला. सदर निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा यासाठी विविध सामाजिक संघटनांनी लाखांदूर तालुका बंदचे आव्हान केले आहे.

एससी एसटी प्रवर्गातील जातींचे उपवर्गिकरन करण्याच्या निर्णयामुळे देशातली एससी एसटी प्रवर्गातील जाती जाती मध्ये तंटे निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच संविधानातील ३४१ व ३४२ कलमाचे उलंघन होऊन संविधानाच्या मूळ उद्देशाला हानी पोहचू शकतो. त्यामुळे दि. १ आगस्ट २०२४ चा निर्णय रद्द करण्यात यावा या मागणीसाठी लाखांदूर येथील आंबेडकर चौक ते तहसिल कार्यालय लाखांदूर पर्यंत शांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर मोर्चात तालुक्यांतील सर्व समाज बांधवांनी, महिला, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन बुद्धिष्ट समाज संघर्ष समिती तालुका लाखांदूर तथा समता सैनिक दल ता. लाखांदूर आणि आदिवासी समाज समिती तसेच तालुक्यातील विविध सामाजिक संघटनानी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे