
0
5
7
4
4
8
निवारा
तृणतृणांची जोडणी,कष्टांचा हा धागा,
घरट्यात दडलेला जीवनाची जागा..
वैभव नको,नको सोन्याचा सहारा,
प्रेमाने उभा राहतो खरा निवारा..
काडी-काडी वेचुनी बांधला हा संसार,
निसर्ग शिकवितो कष्टांचा आधार..
भिंती नसल्या तरी मायेचा पसारा,
पक्ष्यांच्या घरट्यासारखा असावा निवारा..
वादळाशी झुंज देत उभा राहतो आधार,
कष्टातूनच घडतो सुंदर संसार..
प्रेम, विश्वास,आपुलकीचा सहारा,
तेव्हाच सुखी होतो प्रत्येक निवारा..
निसर्गाची ही कला,अद्भुत हा विचार,
लहानशा जीवाचा मोठा संसार..
मायेच्या धाग्यांनी विणला पसारा,
यालाच म्हणतात खरा निवारा…
श्रीमती सिमादेवी बेडसे
तालुका चाळीसगाव
=========
0
5
7
4
4
8



