कवितानागपूरमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
मतलबी संग्राम कुमठेकर
0
4
8
2
9
0
मतलबी
मतलबी दुनिया म्हणून नकोस मलाही दूर सारू
तूच माझी स्फुर्ती,तुझ्याविना गं धावेल का वारू ?
स्वप्नपुर्ती झाली म्हणून देणार नाही कधी दुरावा
निर्व्याज प्रेम करतो तुझ्यावर काय देऊ पुरावा ?
भाळलो नाही गं रूपावर तुझं मन निर्मळ खूप
मतलबी समजून मला राहू नको अशी तू गुपचूप
तुझ्या आठवणीत दिवसरात्र मी तीळतीळ तुटतो
तुला समोर पाहताक्षणी संयम गं माझा सुटतो
बाहुपाशात तुला घेताच बेधुंद होतो गं रानवारा
स्वप्नकिनारा गाठताना छेडतो हृदयाच्या तारा
सप्तसुरांची मैफिल सखे नित्य हवीशी गं वाटते
गजरा माळलेल्या केसांची बट गालांना गं चाटते
तू जवळ असल्याचा भास हीच माझी प्रेरणा ठरते
स्वप्नपाखरू मिठीत घेईल याच आशेत रात्र सरते
आवाज तुझा पडताच कानी गं मी झटकतो मरगळ
तुझ्याविना करमत नाही समजू नकोस मज अवखळ
संग्राम कुमठेकर
ता.अहमदपूर जि.लातूर
0
4
8
2
9
0



