
0
5
7
9
0
0
माणूस
पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण
सारा देश फिरून झाला
माणूस नावाचा प्राणी
कुठचं नाही गवसला .
वाटलं होतं कुठंतरी
भेटेल मला माणूस
पालथं घातलं जग
पण नाही मागमूस.
कुठं अत्याचारी
अन् कुठं भ्रष्टाचारी
कधी भेटतो खूनी
तर कधी बलात्कारी.
माणसाच्या राज्यात
माणूस भेटत नाही
काय होणार पुढे
काहीच कळत नाही.
चालून- चालून थकले
बसले एका दगडावर
कुणाची तरी थाप
पडली माझ्या पाठीवर.
वळून पाहिलं मागे
मला कळेचना काही
फक्त आवाज आला
‘निराश व्हायचं नाही.’
जनावरांच्या गर्दीत
काही माणसंही आहेत
ज्यांच्या खांद्यावर
या जगाचा भार आहे.
पण ध्यानात ठेव
हजारात माणूस
एखादाच दिसेल
शोधून पाहा-
नक्कीच सापडेल.
भुमेश्वरी सातपुते खोंडे
ता.उमरेड जि. नागपूर
0
5
7
9
0
0



