
0
5
2
4
6
6
खरा दोस्त
पावसाळ्याचे दिवस होते
मी शाळेत भिजत जायचा
माझा खरा दोस्त छत्री
घेऊन माझ्यासाठी यायचा
रोज एकाच छत्रीत दोघे
शाळेत मिळून जायचे
वर्गात एकाच बाकावर
मिळून आम्ही बसायचे
मी गरीब असल्याने मला
तो सांभाळून घ्यायचा
कधी माझ्याकडे पेन
नसली की तो द्यायचा
खरा दोस्त माझा मनमिळाऊ
स्वभावाने खूप प्रेमळ होता
बालपणापासून तो संस्कारी
इतर मित्रा पेक्षा अलग होता
सर्व मुलांपेक्षा खूप हुशार
शाळेतही शिस्तप्रिय होता
सदैव मदतीला धावून येणारा
खरा दोस्त माझा मला प्रिय होता
प्रतिमा नंदेश्वर
ता.मूल,जि. चंद्रपूर
0
5
2
4
6
6



