Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रपुणे

बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,आवास मध्ये वक्तृत्व स्पर्धा संपन्न

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

0 4 8 2 9 0

बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,आवास मध्ये वक्तृत्व स्पर्धा संपन्न

सदाभाऊ पेंडसे ट्रस्ट, पुणे यांचे आयोजनात सहकार्य

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

अलिबाग: (दि. २७) आ. सा. धो. रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मध्ये स्वर्गीय प्रभाकर सदाशिव राणे सभागृहात बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास आणि सदाभाऊ पेंडसे ट्रस्ट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि २७ रोजी वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली.

इ.११ वी व इ. १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी एक गट तसेच इ. ९ वी व इ.१० वी च्या विद्यार्थ्यांसाठी एक गट अशा दोन गटात स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. स्पर्धेमध्ये इ. ९ वी व इ. १० वी गटासाठी आज छत्रपती शिवराय असते तर, महाराष्ट्रातील संतांचे कार्य, माझी सावित्रीबाई होती म्हणून हे विषय तर इ. ११ वी व इ. १२ वी गटासाठी शिक्षण अॉनलाईन की अॉफलाईन, प्लास्टिक काळाची गरज, आज स्त्री सुरक्षित आहे का ? हे विषय देण्यात आले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान दत्तात्रेय अहिरे सर यांनी भुषविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन कैलास शिकारे सर यांनी केले. मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला व अतिशय सुंदर भाषणे करून उपस्थितांची मने जिंकली. धनराज फड सर व यतिश शिंदे सर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले आणि धनराज फड सर यांनी परीक्षक म्हणून आपले मनोगत व्यक्त केले.

*स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे–*

*इ. ११ वी, इ. १२ वी गट*–
*प्रथम क्रमांक-* म्हात्रे ध्रुवी राजेंद्र [ इ.११ वी कला ]
*द्वितीय क्रमांक-* म्हात्रे सई सुबोध [ इ.११ वी वाणिज्य ]
*तृतीय क्रमांक-* लांडगे अंकिता अंकुश [ इ.१२ वी वाणिज्य ]

*इ.९ वी, १० वी गट*–

*प्रथम क्रमांक*– म्हात्रे पायल संजय [ इ.९ वी अ ]
*द्वितीय क्रमांक*– माने पूर्वा संजय [ इ.१० वी ब ]
*तृतीय क्रमांक*– पाटील अवंती शांताराम [ इ.९ वी अ ]

स्पर्धेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सदाशिव पेंडसे ट्रस्ट, पुणे यांच्या मार्फत प्रमाणपत्रे व रोख रक्कमेच्या स्वरूपात पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ग्रुप – ग्रामपंचायत, आवास सरपंच अभिलाषा अभिजीत राणे, आ.सा. धो. रहिवासी हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष रणजीत प्रभाकर राणे, संस्थेचे सर्व पदधिकारी, सर्व सभासाद, शालेय समितीचे सर्व पदाधिकारी, सर्व सभासद, मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे