0
4
8
2
8
6
रानफूल
मी रानातील रानफूल, बंदिस्त कशाला कुंडीत
कर जराशी भूल तू, ये बिंधास्त मजला धुंडीत.. //
लोहाच्या तारा जाळ्यांचे, नको भोवती कुंपण
मोहाचे पिंजरे माळ्याचे, नको मोजके शिंपण.. //
काटे, कुटे,दगड,गोटे, तू ये धुंडाळीत रानवाट
निसर्गाच्या कुशित माझा, असे आगळा थाट.. //
श्रावणसरी पिऊन तृप्त, झेलतो शिशिर कहर
पुनर्जन्म घेतोय पुन्हा, अंगोपांगी वसंत बहर.. //
राना वनात उन्हातही, बघ रूप माझे निखरे
गर्द फिके रंग गंध तरी, मज भुलती फुलपाखरे.. //
मुक्त डोलतो वार्यावर, फुलतो नाजूक वेलीवर
खुलुन दिसेन अजून तुझ्या, माळूनी घे वेणीवर..//
या क्षणभंगुर आयुष्याचे, होवूनी जावे साफल्य
तुझ्या कुंतली वसावे मी, होण्या आधी निर्माल्य.. //
विष्णू संकपाळ बजाजनगर
छ. संभाजीनगर
==============
0
4
8
2
8
6



