Breaking
अमरावतीआरोग्य व शिक्षणई-पेपरकविताविदर्भसाहित्यगंध

भेट “स्वप्नातील”

श्रीमती सुलोचना लडवे अमरावती

0 4 8 2 9 0

भेट “स्वप्नातील”

भेट स्वप्नातील आईसोबत
जाते मनी लावून चटका
भूतकाळ होतो पूर्ण जागृत
मनपटलावर उमटतो ठसा

ध्यानी मनी नसताना
अचानक येते स्वप्नात
करून गरम स्वयंपाक
वाढते प्रेमाने ताटात

वाटते तिचे अस्तित्व
रेंगाळते माझ्याभोवती
स्वप्नामधून देते सदा ती
निष्पाप प्रेमाची प्रचिती

दररोजचा हा नित्यक्रम
मनाला देतो विश्रांती
दूर जावून बारा वर्ष
तरी रोज ती माझ्यासंगती

वाटते प्रेमाची ही गुंफण
द्वैत आणि अद्वैताची
अंतरात उमलते खरी
ओढ रक्ताच्या नात्याची

श्रीमती सुलोचना लडवे
अमरावती
सदस्या,मराठीचे शिलेदार समूह

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे