Breaking
आरोग्य व शिक्षणनागपूरपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्र

एसटीत सापडलेला दीड तोळ्याचा ‘लक्ष्मी हार’ मूळ मालकिणीला परत!

प्रतिनिधी: वसुधा नाईक, पुणे

0 5 2 2 6 4

एसटीत सापडलेला दीड तोळ्याचा ‘लक्ष्मी हार’ मूळ मालकिणीला परत!

शिवज्योत अकॅडमीच्या शिक्षिका मोनाली माने यांचा प्रामाणिकपणा; पंचक्रोशीत कौतुक

प्रतिनिधी: वसुधा नाईक, पुणे

बिनधास्त न्यूज नेटवर्क

चिकुर्डे (दि ३० मार्च): पैशांच्या आणि दागिन्यांच्या मोहात भल्याभल्यांची नीयत फिरत असताना, चिकुर्डे (ता. वाळवा) येथील शिवज्योत अकॅडमीच्या सहाय्यक शिक्षिका मोनाली माने यांनी एसटी बसमध्ये सापडलेले पाकीट व त्यातील दीड तोळ्याचा सोन्याचा ‘लक्ष्मी हार’ मूळ मालकिणीचा शोध घेऊन सुखरूप परत केला. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

​सविस्तर वृत्त असे की, शिवज्योत अकॅडमीच्या शिक्षिका मोनाली माने या ईश्वरपूर ते चिकुर्डे असा एसटी बसने प्रवास करत होत्या. या प्रवासादरम्यान त्यांना बसमध्ये एक बेवारस पाकीट सापडले. त्यांनी ते उघडून पाहिले असता, त्यामध्ये दीड तोळ्याचा सोन्याचा ‘लक्ष्मी हार’ आणि वत्सला वसंत कांबळे या महिलेचे आधार कार्ड आढळून आले. एवढा मौल्यवान दागिना सापडूनही माने यांनी कोणताही मोह न ठेवता मूळ मालकाचा शोध घेण्याचे ठरवले.
​आधार कार्डवरील पत्ता तपासला असता, तो लाडेगाव येथील असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

माने यांनी तत्काळ शिवज्योत अकॅडमीत शिकणाऱ्या लाडेगाव येथील संपर्कातील विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधला. त्यांच्या माध्यमातून वत्सला कांबळे या आजींपर्यंत निरोप पोहोचवून, ‘तुमचे पाकीट आणि हार आमच्याकडे सुरक्षित आहे,’ अशी स्पष्ट कल्पना दिली.

​आपला हरवलेला दागिना सुरक्षित असल्याचा निरोप मिळताच वत्सला आजी आणि त्यांच्या मुलीने थेट चिकुर्डे येथील शिवज्योत अकॅडमीत धाव घेतली. ओळख आणि खात्री पटल्यानंतर माने यांनी ते पाकीट आणि सोन्याचा हार आजींच्या स्वाधीन केला. मौल्यवान दागिना जसाच्या तसा परत मिळाल्याने आजींना गहिवरून आले.

​पाकीट ताब्यात घेताना, “आजच्या युगात असा प्रामाणिकपणा पाहायला मिळणे खरोखरच दुर्मिळ आहे,” अशी कृतज्ञतापर भावना वत्सला आजी व त्यांच्या लेकीने व्यक्त केली. या निस्वार्थी आणि प्रामाणिक कृतीबद्दल शिवज्योत अकॅडमीचे संस्थापक धनाजी शिद, शिक्षक वृंद आणि ग्रामस्थांकडून मोनाली माने यांचे विशेष अभिनंदन केले जात आहे.

1/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 2 2 6 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे