आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनविदर्भसाहित्यगंध
पाककृती ‘दाल दुल्हन’
मीनाक्षी काटकर ता.दारव्हा जि.यवतमाळ
0
4
8
2
9
0
माझी पाककला
पाककृती ‘दाल दुल्हन’
साहित्य: तांदूळपीठ २००ग्रॅ, तुरीची डाळ ५० ग्रॅम उपलब्धतेनुसार शेवग्याच्या शेंगा, फुलकोबी,टमाटर, चिरलेली कोथींबीर,हळद,लाल तिखट,सांबर मसाला,तेल, कडीपत्ता, चिंच,लसूण,कांदा,जीरे,मोहरी,मीठ इत्यादी.
कृती: तांदळाचे पीठ, मीठ,हिरवी मिरची पेस्ट घालून गरम पाण्यात शिजवून गोळा मळून घ्या.त्या पीठाचे छोटे गोळे बनवून खोलगट वाट्या बनवून घ्या. सांबर बनवून उकळी आल्यावर त्यात बनवलेल्या वाट्या घाला.दहा मिनिटे शिजू द्या.चिरलेली कोथिंबीर पेरून खायला द्या,गरमागरम दालदुल्हन. सोबत ओल्या खोब-याची चटणी, लोणचे व एखादे स्वीट पण द्या.
मीनाक्षी काटकर
ता.दारव्हा जि.यवतमाळ
==========
0
4
8
2
9
0



