जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सावरला येथे शिक्षण परिषदेचे यशस्वी आयोजन
बिनधास्त न्यूज नेटवर्क

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सावरला येथे शिक्षण परिषदेचे यशस्वी आयोजन
सावरला पवनी प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
पवनी: (दि. १ ऑगस्ट ) जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,सावरला येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रा. विलासजी कुर्झेकर सर उपस्थित होते.कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून सावरला केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय श्री आशिष डोंगरे साहेब,तसेच शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री सी.एच. फुंडे सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या शिक्षण परिषदेत विविध शैक्षणिक विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शकांनी उपस्थित शिक्षकांना प्रभावी मार्गदर्शन केले.ठाकरे सर यांनी मूल्यवर्धन प्रशिक्षण विषयावर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त बाबी स्पष्ट केल्या.डॉ.मुरलीधर रेहपाडे सर यांनी गुणवत्तापूर्ण अध्यापनासाठी आवश्यक असलेल्या आधुनिक शैक्षणिक संकल्पनांवर मार्गदर्शन केले.राहुल पाटील सर यांनी सेतु अभ्यासक्रम प्रभावीपणे राबविण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.राकेश पारधी सर यांनी अध्यापनातील नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली.सुमित संगेल सर यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) मधील महत्त्वपूर्ण बदल व त्यांची प्रभावी अंमलबजावणी याविषयी सविस्तर विवेचन केले.उत्तम शिंदे सर यांनी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण करण्यासाठी आवश्यक नियोजन,मार्गदर्शन व विविध उपक्रमांची माहिती दिली.मधुबाला देशमुख मॅडम यांनी विद्यार्थीकेंद्रित अध्यापन, मूल्यमापन आणि शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी केंद्रप्रमुख आदरणीय श्री आशिष डोंगरे साहेब यांनी केंद्रातील सर्व शिक्षकांकडून शिष्यवृत्ती परीक्षेच्या तासिकांबाबत सविस्तर विचारणा केली.तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी सातत्यपूर्ण नियोजन,नियमित सराव आणि प्रभावी अध्यापनावर भर देण्याचे आवाहन केले..
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,सावरला येथील विद्यार्थीप्रिय शिक्षक आदरणीय श्री शुभम बावनकुळे सर यांनी केले.संपूर्ण शिक्षण परिषद ज्ञानवर्धक, प्रेरणादायी व शिक्षकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरली.



