Breaking
ई-पेपरनागपूरविदर्भ

जि.प. शाळा मालेवाडा येथे संत गाडगे बाबा जयंती साजरी

रजत डेकाटे प्रतिनिधी भिवापूर/ मालेवाडा

0 4 8 2 9 4

जि.प. शाळा मालेवाडा येथे संत गाडगे बाबा जयंती साजरी

हातात झाडू घेऊन विद्यार्थ्यांनी काढली प्रभातफेरी

रजत डेकाटे प्रतिनिधी
भिवापूर/ मालेवाडा

बिनधास्त न्यूज वृत्तसेवा

भिवापूर प्रतिनिधी:-भिवापूर तालुक्यातील मालेवाडा येथील उच्च प्राथमिक शाळा येथे कर्मयोगी राष्ट्रसंत, स्वच्छतेचे जनक पूज्यनीय गाडगे बाबा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

याप्रसंगी कार्यक्रमाला अध्यक्षा म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष स्वातीताई सहारे तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समिती सदस्य रमेश लोनगाडगे व ग्रामपंचायत सदस्य दुर्गाताई सहारे आदी मान्यवर प्रामुख्याने यावेळी उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे माल्यर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी ग्रामस्वच्छता अभियानाचा औचित्य साधून शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांनी हातात झाडू घेऊन गावात प्रभातफेरी काढली. विशेष म्हणजे शाळेतील अंश लोनगाडगे व तेजस सहारे हे विद्यार्थी गाडगेबाबा यांच्या वेशभूषेत ग्रामस्थांचे लक्ष वेधण्यात यशस्वी ठरले.

यासोबतच विद्यार्थिनींनी स्वच्छतेवर आधारित नृत्य सादर केले. सहाय्यक शिक्षक सुरज येल्ले यांनी गाडगेबाबा जीवनावर प्रकाश टाकला. तसेच सहाय्यक शिक्षिका भुमेश्वरी सातपुते यांनी स्वच्छतेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वर्षा चापले यांनी तर संचालन मुख्याध्यापिका शिला रोडे यांनी तर वर्षा कश्यप यांनी आभार मानले. यावेळी अंगणवाडी सेविका रंजना गेडाम,अजय झोडापे, श्रीराम डवरे,कवडु सहारे, रजत डेकाटे आदींची उपस्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे