0
4
8
2
9
7
लाजाळू दिवा
तेवत होता संध्यासमयी
स्वप्न मग्न आत्म विचारी
कुठून आली खट्याळ लहर
वात बोले तू प्यारी
अंगात शहारला मनात लाजला
फडफड केली पापणी
लाजाळू दिवा लाजेत डुंबला
मनाचे झाले पाणी
सूचेना काही शब्द फुटेना
उघडझाप ती नेत्री
बाण अचूक तो वर्मी लागला
वातलहरेस झाली खात्री
सूर जुळले कोण्या समयी
अवचित घडली कहाणी
मी विझणार रे तव स्पर्शाने
बावरले मन शोकांतिकेनी
कसा विझवू प्रियतम तू
एकवेळ वाहणे होईल खंड
डुंबलो जन्मभरासाठी
वावरेल आसपास अखंड
शर्मिला देशमुख, बीड
=========
0
4
8
2
9
7



