Breaking
ई-पेपरकवितानागपूरमहाराष्ट्रमुंबईविदर्भसाहित्यगंध

माणुसकीची पेरणी

श्री.पांडुरंग एकनाथ घोलप

0 4 8 2 9 4

माणुसकीची पेरणी

चला करू या आपण सारे
इथे माणुसकीची पेरणी
होतील सारे आनंदी जन
सुखी आयुष्याची कहाणी

माणुसकीच्या नात्याचे
उधळू रंग आता नवे
होईल प्रेमाची बरसात
सुखाला आणखी काय हवे

माणूसपण जपण्यातच आहे
खराखुरा चांगुलपणा
आपुलकीच्या स्पर्शाने होते
मायाममतेचा लडिवाळपणा

काय हवे जीवनात या
थोडा स्नेहाचा परिपोष
थोपवू शकेल माणुसकी
जीवाचा होणारा आक्रोश

म्हणून माणुसकीची पेरणी
करू या जीवनरूपी शेतात
जीवन जगू या आनंदाने
घेऊन आपले हात हातात

श्री.पांडुरंग एकनाथ घोलप
रोहोकडी,ता.जुन्नर, जि.पुणे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे