Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भ

बी.आर.ओ.मध्ये ‘आयटीआय’च्या पाच प्रशिक्षणार्थ्यांची यशस्वी भरती

नागपूर शहर प्रतिनिधी

0 4 8 2 8 4

बी.आर.ओ.मध्ये ‘आयटीआय’च्या पाच प्रशिक्षणार्थ्यांची यशस्वी भरती

संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची भरारी

नागपूर शहर प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

नागपूर : (दि ११) संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) नागपूर येथील बिल्डिंग कन्स्ट्रक्शन व्यवसायातील पाच प्रशिक्षणार्थ्यांची बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन (बी.आर.ओ.) या प्रतिष्ठित शासकीय संस्थेत यशस्वी निवड झाली आहे. निवड झालेल्या प्रशिक्षणार्थ्यां मध्ये प्रमोद बाबुराव भोयर, रोहित प्रमोद मिराशे, मिलिंद उदेभान भिओगाडे, अक्षय बालकृष्ण जंजाळ व एसाकी अरुमुगमपांडी तेवर यांचा समावेश आहे.

या यशामागे क्राफ्ट इन्स्ट्रक्टर इंद्रभूषण बेलसरे व प्रभाकर मुंडे यांचे विशेष परिश्रम कारणीभूत ठरले. तसेच उपसंचालिका सौ. श्वेता कुलकर्णी, उपप्राचार्य श्रीमती किशोरी पंडिले व जयंत टालाटुले गटनिर्देशक व अविनाश केने गटनिदेशक यांनी दिलेले मार्गदर्शन मोलाचे ठरले.

बिल्डिंग कन्स्ट्रक्शन व्यवसायातून शासकीय व खासगी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहे. ज्यामध्ये लार्सन व टुब्रो विविध शासकीय संस्था तसेच बी आर ओ जलसंधारण यासारख्या तसेच वेगवेगळ्या प्रायव्हेट संस्था व कंपन्या यामध्ये सुद्धा तसेच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत. या संधीचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन उपसंचालिकां यांनी केलेले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे