आरोग्य व शिक्षणई-पेपरनागपूरविदर्भ
मालेवाडा येथील जि.प. शाळेत दहीहंडी उत्सव साजरा.
रजत डेकाटे प्रतिनिधी
0
4
8
2
9
0
मालेवाडा येथील जि.प. शाळेत दहीहंडी उत्सव साजरा.
रजत डेकाटे प्रतिनिधी
भिवापूर: मालेवाडा येथील जिल्हा परिषद शाळेत दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण आणि गोपिकांच्या वेशभूषेत सहभागी होत कार्यक्रमाला रंगत आणली. विशेष म्हणजे वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी दहीहंडी बांधून शिक्षकांच्या मदतीने पूजन केले. रडू नको बाळा मी पाण्याला जाते या गाण्यावर विद्यार्थ्यांनी नृत्य करत आनंदात दहीहंडी उत्सव मालेवाडा येथील जिल्हा परिषद शाळेत साजरा केला.
यावेळी मुख्याध्यापिका शिला रोडे, शिक्षिका भूमेश्वरी सातपुते, शिक्षिका वर्षा चापले, शिक्षक सुरज येल्ले व शिक्षण सेवक अजय झोडापे व शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
4
8
2
9
0



