Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूर

आसमान फाऊंडेशन व आसमान महिला क्रेडिट सोसायटी तर्फे कर्तृत्ववान दिव्यांग महिलांचा सन्मान

नागपूर शहर प्रतिनिधी

0 5 1 6 5 1

आसमान फाऊंडेशन व आसमान महिला क्रेडिट सोसायटी तर्फे कर्तृत्ववान दिव्यांग महिलांचा सन्मान

नागपूर शहर प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

नागपूर: (दि १३) विदर्भात सामाजिक कार्यात अग्रेसर संस्था आसमान फाऊंडेशन व आसमान महिला को-ऑप क्रेडिट सोसायटी जिल्हा नागपूर तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त विदर्भातील कर्तृत्ववान दिव्यांग महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे होप फॉर होपलेसच्या संचालिका व दिव्यांगासाठी कार्यरत समाजसेवी डॉ रुची जैन, संगीत विशारद समाजसेवी विशाखा पाध्ये, अध्यक्ष आसमान फाउंडेशन डॉ रवि गि-हे, सचिव नरेश शेंडे, आसमान महिला सोसायटी अध्यक्ष मेघा गि-हे, संचालक दिनेश टेकाडे, पूजा शेंडे, पायल काळे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन विभा विंचुरकर, आभार प्रदर्शन डॉ. साधना थोते व स्वागत गीत सौ.मधुरा कोलारकर यांनी प्रस्तुत केले. कार्यक्रमात समाजातील कर्तबगार व होतकरु दिव्यांग, अंध, अपंग, मतिमंद, मूकबधीर, कर्णबधीर महिलांच्या कार्याचा गौरव केला गेला. ज्यात सुप्रसिध्द अधिवक्ता नंदिता रविंद्र त्रिपाठी – दिव्यांग महिला, कु पूजा मिलमिले –शास्त्रीय संगीत विशारद व दूरदर्शन येथे कार्यरत –दिव्यांग मुलगी, कु. सुहा अविनाश सोनूले वय 10 वर्ष – पॉवरलिफ्टिंग मध्ये अनेक पुरस्कार प्राप्त विकलांग मुलगी, कु. राधा श्रीकांत देशपांडे –आर्ट, क्राफ्ट, पेंटिंग व डांस क्षेत्रात उत्तम कार्य करणारी मतिमंद मुलगी, सौ. भाग्यश्री तितरमारे –कर्णबधीर असूनही आर्ट, क्राफ्ट सह ब्यूटी पार्लर चालविणारी महिला, कु. रुखमा गणपत भोयर कर्णबधीर कामकाजी महिला, मूकबधीर निवासी शाळा सावनेर, कु. दिपाली गंगाधर गोखे कर्णबधीर असूनही सहायक कला शिक्षक पदावर सावनेर येथे कार्यरत, कु. वर्षा हेमराज भलावी वर्ग 4 था कर्णबधीर असूनही शिक्षण घेण्याच्या जिद्दीने सावनेर येथील मूक बधीर शाळेत प्रवेश, अशा जगावेगळ्या दिव्यांग मुली व महिलांना स्मृतीचिन्ह व भेटवस्तू देवून सन्मानित केले गेले.

डॉ रवि गि-हे यांनी संस्थेतर्फे अनेक वर्षापासून निराधार, गरीब, वंचित, दिव्यांग, आदिवासी मुले व महिलांसाठी आयोजित केल्या जाणा-या उपक्रमांची माहिती दिली. लवकरच संस्थेतर्फे गरीब, निराधार वृध्दांसाठी व सामान्य वरिष्ठ नागरिकांसाठी वृध्दाश्रम सुरु करण्याची योजना असल्याची माहिती दिली. याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी, सदस्यगण व अनेक गणमान्य नागरिक सहभागी झाले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 6 5 1

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे