
0
6
3
9
6
0
चॉकलेटचा मळा
चॉकलेटच्या बागेत जाऊ
गोड गोड स्वप्नं पाहू
घसरगुंडीवरुन घसरू हसत
मस्तीमध्ये सारे नाचू।।१।।
चॉकलेटचा झुला झूलू
आकाशाला स्पर्श करू
हसत खेळत मित्रांसोबत
गोड क्षणांचा मेळ धरू।।२।।
किटकॅट, डेअरीमिल्कची झाडं
स्ट्रॉबेरी, लिमलेटची फुलं
लगडलेली चॉकलेटची फळं
खाऊन होऊ आनंदी सगळं।।३।।
किटकॅटची काठी उंच
डेअरीमिल्कची झाडं दाट
स्ट्रॉबेरीच्या सुगंधाने
भरला गोड गार वाऱ्याचा घाट।।४।।
लिमलेटच्या चमचम फुलांत
मधासारखी गोडी दाट
तोडू फळं चॉकलेटची
आनंदाने धरु आपली घरची वाट!।।५।।
गोड गोड चॉकलेटचा मळा
शाळेचाही लावीतो लळा
हसा खेळा चाॅकलेटच्या बागेत धावा
नवनवीन चाॅकलेटची फळझाडे लावा ।।६।।
गणेश नरोत्तम पाटील
ता.शहादा, जि. नंदुरबार
==========
0
6
3
9
6
0



