ई-पेपरकवितानागपूरपश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध
“लक्ष्यवेध”
पांडुरंग एकनाथ घोलप रोहोकडी, जुन्नर, पुणे
0
4
8
2
9
0
“लक्ष्यवेध”
लक्ष्यवेध करण्यासाठी
सदा असावे तत्पर
ध्येयवादी राहून यापुढे
मार्गस्थ व्हावे सत्वर
आशेचा किरण देईल
या कार्यालागी प्रेरणा
निराशेला सारून बाजूला
दूर कराव्या वेदना
काय हवे निश्चित आपणास
त्याचा लेखाजोखा करावा
नियोजन करून व्यवस्थित
ध्येयाचा मार्ग धरावा
खडतर असेल प्रवास
पाऊल थांबवू नये
ध्येयपूर्तीचे स्वप्न आपले
कधीही लांबवू नये
लक्ष असावे लक्ष्यावरी
मनी असावा स्वाभिमान
स्वप्न सत्यात उतरण्यास
प्रयत्नांना करावे गतिमान
पांडुरंग एकनाथ घोलप
रोहोकडी, जुन्नर, पुणे
=========
0
4
8
2
9
0



