Breaking
आरोग्य व शिक्षणपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्रसाहित्यगंध

जादुई गोधडी

वसुधा वैभव नाईक धनकवडी जिल्हा पुणे

0 4 0 9 0 3

जादुई गोधडी

‘गोधडी’ म्हणजे काय हा प्रश्न आत्ताच्या नवीन मुलांना पडलेला असेल? गोधडी म्हणजे पूर्वीच्या काळी कपडे वापरून झाल्यानंतर कॉटनचे कपडे एकमेकाला जोडून उबदार पांघरून शिवलं जायचं त्याला गोधडी असं म्हणायचं.! गोधडीच्या आत अनेक कपडे असायचे स्कर्ट, परकर, शर्ट, साडी, असे कपडे एकमेकाला शिवून एक छान चादर बनवली जायची. आणि त्या खालून आणि वरून छान आईच्या मऊ साड्या लावल्या जायच्या. हाताने घरी ते शिवायचे. मस्त रजई तयार व्हायची. हिलाच ‘गोधडी’ असं म्हटलं जायचं. गोधडी हा शब्द खूप जुना आहे. या शब्दामध्ये माया, प्रेम आहे. गोधडी उबदार आहे. अंगावर पांघरली ही आईची माया मिळते.

ही ‘जादुई गोधडी’ अंगावर पांघरली की, आपल्याला आपल्या आईने आपल्याला जवळ घेतलं असं वाटतं. आईची उब मिळते. खूप जुन्या आठवणी मनात रुंजी घालतात. त्याच मायेच्या हातानं शिवलेली ही गोधडी जवळ असली, की भावाची आठवण येते. बहिणीची आठवण येते. वडिलांची आठवण येते. कारण त्याच्यामध्ये भावाचा, वडिलांचा शर्ट आहे, तर बहिणीचा स्कर्ट व फ्रॉक आहे. आजीची मऊ साडी आहे. आजोबांचे धोतर पान आहे. किती आठवणी जुन्या होऊन जातात. पण त्या एका गोधडी पांघरल्यामुळे आपले मन त्या काळामध्ये निघून जाते. त्यातच आपण काही वेळ रममाण होतो. आणि त्यातून जर आई आणि आजी नसेल, आपले वडील हयात नसतील तर मन खूप भरून येते.

काही ठिकाणी अजूनही अशा गोधड्या आहेत. अजूनही अशा गोधड्या तयार केल्या जातात. जुन्याचे नवं करणं हा यातला प्रकार आहे. आपण हल्ली Use and Throw… या काळात वावरतोय. पण पूर्वीची लोक वापरलेल्या गोष्टींचा परत उपयोग करत होते आणि त्यातूनच ही नवीन निर्मिती होत होती. त्यातील हा गोधडी एक प्रकार आहे. आठवणींचा फेरफटका आहे. सध्या थंडी वाजली की लोक ब्लॅंकेट घेत आहेत. नवीन, नवीन प्रकारचे अगदी मऊसूत ब्लँकेट मिळतात बाजारात. पण या गोधडीची सर या ब्लॅंकेट ला अजिबात येत नाही. ऊब मिळते पण त्यात माया मात्र नसते. आईच्या हाताची ऊब मिळत नाही. आईच्या मऊशार साडीचा स्पर्श मिळत नाही. तर मित्रांनो, जर आपल्याकडे गोधडी असेल तर, खरच त्याचा योग्य तो वापर करा आणि बघा आपल्या आईचा आपल्या आजीचा हा ठेवा जो आहे तो आपल्याला खूप आनंद देऊन जातो. पुन्हा त्या क्षणात हरवायला होते. आनंद मिळतो आईजवळ असण्याचा. आनंद मिळतो आजीचा उबदार पदर मिळण्याचा.

आपल्याला ह्या जुन्या गोधड्या वापरायच्या नसतील तर ऍटलिस्ट जे लोक अनाथ आहेत त्या लोकांना देऊन टाका. त्यांना तरी त्याची ऊब मिळू देत. माझ्या घरी अजूनही ह्या गोधड्या आहेत. त्या माझ्या सासूबाईंनी आणि माझ्या आईने शिवलेल्या आहेत. त्यामध्ये सासूचे आणि आईचे दोघींचेही प्रेम सामावलेले आहे. माझी नातवंड आता याचा उपयोग करतात. गोधडी शिवाय ती झोपतच नाहीत. अशी जादू आहे या गोधडी मध्ये. हल्ली गोधडीचा हा ‘ट्रेंड’ परत नव्याने चालू होत आहे. नव्या नव्या डिझाईन मध्ये ही गोधडी आपल्याला बघायला मिळते. पण त्यात आईची माया नाही हे मात्र निश्चितच आहे.

“प्रेमाच्या मायेच्या, उबदार गोधडीला
जवळ घ्यावे, अन् जुन्या आठवत रमावे.”

वसुधा वैभव नाईक
धनकवडी जिल्हा पुणे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 9 0 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे