Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रपुणे

मान्यवरांच्या व्याख्यानाने गाजणार, यंदाची ‘बाबासाहेब पुरंदरे’ स्मृती व्याख्यानमाला

अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी

0 4 8 2 9 0

मान्यवरांच्या व्याख्यानाने गाजणार, यंदाची ‘बाबासाहेब पुरंदरे’ स्मृती व्याख्यानमाला

कौशिक आश्रम व अक्षयसेवा प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम

अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी

पुणे.दि.4डिसें (प्रतिनिधी) – दरवर्षी प्रमाणे यंदाही “कौशिक आश्रम” आणि “अक्षय सेवा संशोधन प्रतिष्ठान” यांच्या वतीने “बाबासाहेब पुरंदरे स्मृती व्याख्यानमाला” आयोजित करण्यात आली आहे. व्याख्यानमालेत शनिवार,दिनांक ७ डिसेंबर रोजी अविनाश धर्माधिकारी यांचे ‘भारत तोडो षडयंत्र’ या विषयावर व्याख्यान होईल.

यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच रविवारी दि. ८ डिसेंबर रोजी ‘भारताच्या वैभवाचा आधार – माझं घर माझा परिवार’ या विषयावर विवेक घळसासी यांचे व्याख्यान होईल. यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि कायदेतज्ज्ञ डी. डी. शहा यांची प्रमुख उपस्थिती असेल, अशी माहिती संयोजकांनी दिली.

न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड येथे सायं. ७ वाजता ही व्याख्याने होणार असून हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. तरी; जिज्ञासू अभ्यासक व रसिकांनी नेहमीप्रमाणे या कार्यक्रमास जास्तीत संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सुनील राऊत यांनी केले आहे.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे कौशिक आश्रमाच्या उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान होते. त्या कृतार्थ भावनेने बाबासाहेबांच्या स्मृती जपण्यासाठी दरवर्षी ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात येते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे