Breaking
ई-पेपरकवितावर्धाविदर्भसाहित्यगंध

गुपित मनाचे

डॉ. बालाजी राजूरकर हिंगणघाट जि. वर्धा

0 4 8 2 9 0

गुपित मनाचे

मनात दडलेले गुपित
कोणास सांगू कसे?
राहवत नाही जरा,
मनाला धरू मी कसे?

रात्र झोप न लागे,
डोळे उघडेच राहती.
मनातील वादळांना
शांत हळूहळू करती.

कधी लाजतो मनाशी,
कधी एकटाच हसतो.
स्वप्नांच्या गाठीभेटीत
गोंधळातच हरवतो.

येते स्वप्नसुंदरी कधी,
डोळ्यांनी कटाक्ष करते.
हळूच हसते गालात,
नव्या वाटेने नेऊ पाहते.

वाटे सांगावे जगाला,
मनातील हे सारे.
भीतीच भासे मनाला,
“वेडा समजतील सारे!”

डॉ. बालाजी राजूरकर
हिंगणघाट जि. वर्धा
===========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे