“गोविंदा आला रे…!” न्यू मून स्कूलमध्ये दहीहंडीचा रंगला थरार
तारका रूखमोडे, प्रतिनिधी

“गोविंदा आला रे…!” न्यू मून स्कूलमध्ये दहीहंडीचा रंगला थरार
बालगोपालांच्या उत्साहाने शाळेचा परिसर झाला कृष्णमय
तारका रूखमोडे, प्रतिनिधी
गोंदिया बिनधास्त न्यूज नेटवर्क
अर्जुनी मोर, (दि ०७) : न्यु मून इंग्लिश मिडीयम स्कूल तथा सायन्स ज्युनियर कॉलेज अर्जुनी मोर, जि गोंदिया येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला.
यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी राधा-कृष्ण वेशभूषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चिमुकले विद्यार्थी राधा आणि कृष्णाच्या सुंदर वेशभूषेत सजून आले होते. त्यांच्या आकर्षक वेशभूषेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.रंगीबेरंगी सजावट, कृष्ण-राधेच्या वेशभूषेतील चिमुकले आणि “गोविंदा आला रे!”च्या जयघोषाने शाळेचा परिसर अक्षरशः कृष्णमय झाला.
महाराष्ट्रात दहीहंडी उत्सवाची परंपरा आहे .या परंपरेनुसार शाळेत दहीहंडी फोडून गोपालकाला वितरित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात श्रीकृष्णाच्या फोटोचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाध्यक्ष प्राचार्य सुरज मोटघरे , प्रमुख अतिथी संस्था सचिव ओमप्रकाशसिंह पवार, ज्युनियर विभागाच्या पर्यवेक्षिका तारका रुखमोडे , प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका प्रतिक्षा राऊत उपस्थित होते.
या कार्यक्रमात नर्सरी ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते. मान्यवर अतिथींच्या उपस्थितीत बालराधा-कृष्णांच्या हस्ते दहीहंडीचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी राधा-कृष्णाच्या गाण्यांवर मनमुराद ठुमके लावत आनंद लुटला. शाळेच्या आवारात बांधण्यात आलेली दहीहंडी ८ वी , ९ वी व ११ वी ,१२ वी मधील विद्यार्थ्यांकडून दोन थर लावत फोडताच हाथी घोडा पालकी… जय कन्हैया लाल की ….असा जल्लोष विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात केला.
चिमुकल्या राधा-कृष्णांनी आपल्या निरागस हास्याने आणि सुंदर वेशभूषेने कार्यक्रमाची रंगत वाढवली. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे दहीहंडी उत्सवाची आठवण विद्यार्थ्यांच्या मनात कायमची कोरली गेली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, परंपरा, एकता आणि संघभावनेचे महत्त्व अनुभवता आले. उत्साह, आनंद आणि भक्तिभावाच्या वातावरणात हा सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला.



