न्यु मून इंग्लिश मिडीयम स्कूल व सा. ज्यु. काॅलेज येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात
तारका रूखमोडे, गोंदिया
न्यु मून इंग्लिश मिडीयम स्कूल व सा. ज्यु. काॅलेज येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात
तारका रूखमोडे, गोंदिया
जिल्हा प्रतिनिधी बिनधास्त न्यूज
अर्जुनी /मोर : तालुक्यातील न्यु मून इंग्लिश मिडीयम स्कूल तथा सायन्स ज्युनिअर कॉलेज येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रा. राकेश उंदीरवाडे, प्रमुख अतिथी संस्थासचिव ओमप्रकाशसिंह पवार, पर्यवेक्षिका प्रा. तारका रुखमोडे,पालक शिक्षक संघ सहसचिव पुष्पा खोब्रागडे ,माजी पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष छगन शाहारे तथा पालकवृंद उपस्थीत होते .
ओमप्रकाशसिंह पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे आणि नृत्य सादरीकरणातून सर्वांना मंत्रमुग्ध केले.व प्रजासत्ताक दिनाचा उत्साह द्विगुणीत केला. ओमप्रकाशसिंह पवार यांनी भारताला बलशाली बनविण्यासाठी कठोर व एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
त्यानंतर प्राचार्यांनी भारतीय नागरिक म्हणून आपली कर्तव्ये आणि अधिकार याविषयी भाष्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर जांभुळकर यांनी केले तर आभार छबू बागडे यांनी मानले. देशभक्तीपर नारे लावत मनामनात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करण्यासाठी प्रभातफेरी काढण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.



