
0
5
1
7
8
7
महिला दिन
महिला रूपाने राधिका
श्रीमंतीने तीच लक्ष्मी
बुद्धीने सरस्वती आली
क्रोधाने महाकाली झाली.
महिला संयमाने अग्निपरीक्षा
देऊन सीता माय झाली .
चातुर्य पनाला लावून
जिजामाता ,झाशीचीराणी
राष्ट्रपती, पंतप्रधान बनली.
महिला, पुराणात त्रिदेवाला
मांडीवर खेळवली
युद्धात दैत्याला नराधमाला
पायदळी तुडवली
महिला सौंदर्याची जशी खान
धैर्याची, शौर्याची इतिहास पान
कुटुंबाचा ,राष्ट्राचा अभिमान
प्रेम ,माया आपुलकीची शान.
महिला ,घराला घरपण देते
माणुसकीला जीवन दान देते
क्रोधाला जाळून प्रेमाने वाहते
म्हणूनच संस्कृती टिकून राहते.
बेबीताई/ अनु विट्ठल बोईनवाड
जिल्हा नांदेड
0
5
1
7
8
7



