जनरल अरुणकुमार वैद्य यांची पुण्यतिथी १० आॕगस्टला
तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी
जनरल अरुणकुमार वैद्य यांची पुण्यतिथी १० आॕगस्टला
तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी
अलिबाग ( दि. ६) भारताचे माजी लष्करप्रमुख , *पँजाब प्रश्न पूर्णतः नष्ट होण्यासाठी सुवर्ण मंदिरात सैन्य घुसविल्यामुळे “शहिद” झालेले , अलिबागचे सुपुत्र जनरल अरुणकुमार वैद्य यांचा ३९ वा स्म्रुतिदिन अलिबाग येथे आयोजिला आहे .
इंडस्ट्रियल हायस्कूलचे माजी विद्यार्थी असलेले जनरल वैद्य भारताचे लष्करप्रमुख असताना २९ सप्टेंबर १९८५ रोजी सदर हायस्कूलला सदिच्छा भेट दिली . लष्करप्रमुख पदावरून सेवानिव्रुत्त होताच त्यांचे शासकीय संरक्षण (सिक्युरिटी ) काढले गेले . ते पुणे येथे आयुष्याची सायंकाळ समाधानाने घालवीत असता शीख आतिरेक्याँकडून दि. १० आ़़ॕगष्ट १९८६ रोजी *शहिद* झाले.
अलिबाग शहरावर शोककला पसरली. . “शहिद” वैद्य जनरल वैद्य यांच्या स्म्रुति चिरकाल राहण्यासाठी इंडस्ट्रियल हायस्कूलला पत्रकार बळवंत वालेकर यांच्या पाठपुराव्यामुळे *माजी लष्कर प्रमुख जनरल अरूणकुमार वैद्य* असे नाव को. ए. सो. ने दिले . तसेच सतत पाठपुरावा केल्यामुळे “शहिद” वैद्य यांचे तैलचित्र जिल्हा प्रशासनाकडून पोलिस अधिक्षक अलिबाग यांच्या कार्यालयासमोरील भिंतीवर लावले गेले .
“शहिद” लष्करप्रमुख अरुणकुमार यांची पुण्यतिथी अलिबाग येथे शासकीय इतमामाने साजरी होण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार बाळवंत वालेकर यांनी जिल्हाधिकारी रायगड यांच्या शिफारशीसह प्रकरण मंत्रालय मुबई येथे पाठविले आहे . तेथील सामान्य प्रशासन विभागाने No, GAD- 49010 / (DESK- 29 दि. १८ / १ /२५ नुसार पुढील कर्यवाहीसाठी मुख्यमंत्री महोदयांकडे पठविले आहे , त्याबाबत पाठपुरावा सुरू आहे.
पुण्यतिथीचा कार्यक्रम दि. १० /८ /२५ रोजी सकाळी १० वाजता अ, ता. शि. प्र. मं. ची शिशुविहार प्राथमिक शाळा , सरखेल आंग्रेवाड्यासमोर अलिबाग येथे आयोजिला आहे . आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. आपले विनीत प्रशांत नाईक (मा. नगराध्यक्ष) रघूजीराजे आँग्रे (आ़ंग्रेंचे वंशज) योगेश मगर (अध्यक्ष सहयोग पत बळवंत वालेकर ( ज्येष्ठ पत्रकार )



