ई-पेपरकविताकोकणपश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध
थोडं तुझं थोडं माझं
पांडुरंग एकनाथ घोलप ता.जुन्नर, जि.पुणे
0
4
8
2
9
0
थोडं तुझं थोडं माझं
तू माझी सहचारिणी
संसाराचं पेलू ओझं
सुखदुःख वाटून घेऊ
थोडं तुझं थोडं माझं
आपला हा संसारगाडा
आपण दोघे मिळून हाकू
नको विवंचना कुठलीही
प्रेमाने घर उजळून टाकू
तुझे काम माझे काम
असा नकोच वादविवाद
आनंदाचे धाम आपले
राहो आपुलकी संवाद
संकटे उभी राहतील
हसत करू सामना
हात हाती घेऊ चल
दूर करण्यास वेदना
थोडं तुझं,थोडं माझं
होतील स्वप्न साकार
आयुष्यभर देत राहू
एकमेकांस आधार
पांडुरंग एकनाथ घोलप
ता.जुन्नर, जि.पुणे
=========
0
4
8
2
9
0



