0
4
8
2
9
3
प्रकोप
पावसाचा जोर,जीवाला घोर
सुसाट वारा,टपोऱ्या धारा
इकडे – तिकडे विध्वंस सारा
मनाला आग लावतात या गारा.
ढगांचा गडगडाट जसा,
विजांचा थरथराट तसाच.
वाघासारखा मेघही गरजला
बेभान होऊन बरसला.
झाडांची ताटातूट जशी
प्राण्यांची बेहाल तशीच
माणसांची धावपळ आणि
जीवाची घायाळ हलाहल.
नदी ,नाले ,तळे आणि,
ओढे सर्वच उतू गेले.
घर शिवार प्रेमाचा,
संसार पुरात न्हाले.
जल प्रकोपात सांडलेला
संसार सावरत आहे.
प्रेमाने जपलेल्या वस्तू ,
आश्रू सोबत आवरत आहे.
अनु /बेबीताई बोईनवाड
ता. जिल्हा नांदेड
========
0
4
8
2
9
3



