
0
6
1
1
8
5
किती वाट पाहू तुझी
किती वाट पाहू तुझी
प्रीत धरूनी आस मनाची
थांबत नाही हृदयातील ठोके
मनाला ओढ लागली सहवासाची
तुझ्याच आठवणीचे वारे सारे
माझ्या मनात आज ही रेंगाळतात
क्षणाक्षणात तुझी आठवण
कोऱ्या मनावर तुझे नाव लिहितात
परत भेट व्हावी तुझी
सहवास तुझाच लाभावा
स्पर्श तुझ्याच प्रीतीचा व्हावा
प्रेमात विरूनही जावा
आतुरता वाढली मनी
हृदयातून हाक देते तुला
प्रेमात मी बुडून गेले सख्या
तुझी चाहूल कायम मला
वाट किती पाहू तुझी
नजर स्मरूण आता थकला
ओठावरचे शब्द विरघळले
आठवणीतही विरह दाटला
कुसुम पाटील
कसबा बावडा, कोल्हापूर
0
6
1
1
8
5



